'एक व्हिलन'ची टीम सध्या सिनेमाच्या प्रमोशन करण्यात बिझी आहे. सिनेमाचे स्टारकास्ट सिध्दार्थ मल्होत्रा, श्रध्दा कपूर आणि रितेश देशमुख विविध इव्हेंटमध्ये जाऊन सिनेमा प्रमोट करत आहे. परंतु अलीकडे, सर्व स्टारकास्ट एकत्र कपिल शर्माच्या 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या टीव्ही शोमध्ये पोहोचले होते.
सिनेमा प्रमोशनसाठी हा शो एक चांगला प्लॅटफॉर्म बनला आहे. तिथे प्रेक्षकांच्या मनोरंजनसह सिनेमाचा परिचयदेखील होतो. मागील अनेक एपिसोडपासून कपिल शर्माने शोमध्ये कोणताही वेगळा लूक साकारला नव्हता. तो बिट्टू शर्माच्या भूमिकेतच दिसत होता. परंतु यावेळी 'कॉमेडी नाइट्स...'च्या सेटवर कपिल एक व्हिलनच्या अवतारात दिसला. त्याच्या पात्राचे नाव सिट्टू होते.
रितेश तिस-यांदा 'कॉमेडी नाइट्स'च्या सेटवर आला आहे. यापूर्वी तो 'ग्रँड मस्ती' आणि 'हमशकल्स'च्या प्रमोशनासाठी शोच्या सेटवर आला होता. शोमध्ये रितेशसह सिध्दार्थ मल्होत्रा, श्रध्दा कपूर आणि मोहित सूरीने शोच्या टीमसह धमाल केली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शोमध्ये पोहोचलेल्या 'एक व्हिलन'च्या स्टार्सची छायाचित्रे...