आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ritesh Deshmukh And Saif Ali Khan On The Set Of Comedy Nights With Kapil

'कॉमेडी नाइट्स...'मध्ये पत्नींची छायाचित्रे दाखवून असे लाजले रितेश-सैफ, बघा Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बॉलिवूड स्टार सैफ अली खान आणि रितेश देशमुख सध्या आपल्या आगामी 'हमशकल्स' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. अलीकडेच प्रमोशनच्या निमित्ताने हे दोघे 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या शोच्या सेटवर पोहोचले होते. यावेळी या दोघांसह त्यांचे कोस्टार राम कपूर, ईशा गुप्ता, तमन्ना भाटिया आणि सिनेमाचे दिग्दर्शक साजिद खानसुद्धा शोच्या सेटवर आले होते.
एका टास्कदरम्यान रितेश आणि सैफला त्यांच्या पर्समधून आपापल्या पत्नीची म्हणजे जेनेलिया आणि करीना कपूरची छायाचित्रे प्रेक्षकांना दाखवायची होती. यावेळी रितेश-सैफचा लाजाळूपणा पाहून उपस्थित प्रेक्षक पोटधरुन हसले. यावेळी रितेश आणि सैफने पलकसोबत तालही धरला. तर दादी (अली असगर) यांच्याकडून दोघांनाही शगूनची पप्पी मिळाली. एकंदरीतच कपिलच्या शोमधील हमशकल्स टीमची धमाल बघण्यासारखी होती.
'हमशकल्स' हा सिनेमा फॉक्स स्टार स्टुडिओ आणि पूजा एन्टरटेन्मेंट यांच्या बॅनरमध्ये तयार झाला असून येत्या 20 जून रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. रितेश, सैफ आणि राम कपूर पहिल्यांदाच तिहेरी भूमिकेत सिनेमात झळकणार आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'कॉमेडी नाइट्स...'च्या सेटवरील 'हमशकल्स' टीमची धमाल-मस्ती...