आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ritesh Deshmukh And Saif Ali Khan On The Set Of Jhalak Dikhla Ja

\'झलक...\'मध्ये पोहोचले रितेश-सैफ, पाहा स्पर्धकांनी कशी केली धमाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि सैफ अली खान सध्या आपल्या आगामी 'हमशक्ल' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यानिमित्त दोघे अलीकडेच 'झलक दिखला जा'च्या सेटवर पोहोचले होते त्यांच्यासोबत दिग्दर्शक साजिद खानसुध्दा दिसला.
सेटवर साजिद, रितेश आणि सैफने स्पर्धकांसोबत डान्स केला. तसेत स्पर्धकांचे दमदार परफॉर्मन्स पाहून तिन्ही स्टार्स अचंबित झाले. शोदरम्यान या स्टार्सनी आपल्या 'हमशक्ल' सिनेमाविषयी सांगितले.
हा सिनेमा 20 जून रोजी रिलीज होणार आहे. सिनेमात सैफ आणि रितेशव्यतिरिक्त राम कपूर, बिपाशा बसु, ईशा गुप्ता आणि तमन्ना भाटियासुध्दा मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. सिनेमाला वासु भगनानीने निर्मित केले असून हिमेश रेश्मियाने संगीत दिले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून तुम्ही पाहू शकता 'झलक दिखला जा'च्या सेटवर रितेश, साजिद आणि सैफची धमाल-मस्ती...सोबतच, स्पर्धकांच्या परफॉर्मन्सची खास झलक...