आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रितेशची स्मॉल स्क्रिनवर एन्ट्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड कलाकारांना छोट्या पडद्याचे नेहमीपासूनच आकर्षण राहिले आहे. वेळोवेळी आपण हे बघितलेसुद्धा आहे. अमिताभ बच्चनपासून ते सलमान खानपर्यंत आणि माधुरी दीक्षितपासून ते शिल्पा शेट्टीपर्यंत सगळेच बडे स्टार छोट्या पडद्याकडे वळले. आता या यादीत आणखी एक नाव सामील झाले आहे. हे नाव आहे मराठममोळ्या रितेश देशमुखचे.

मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर आता अभिनेता रितेश देशमुखला वेध लागले आहेत ते छोट्या पडद्याचे. रितेश आता लवकरच छोट्या पडद्यावर एन्ट्री घेतोय. हं... पण एखाद्या मालिकेत तो झळकणार नाहीये. तर कोरिओग्राफर गीता कपूरबरोबर रितेश देशमुख आता रिअ‍ॅलिटी शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसणार आहे. आता रितेश गीताबरोबर शोध घेणार आहे 'इंडियाज डान्सिंग स्टार'चा.

आपल्या या नवीन प्रोजेक्टविषयी रितेशने काय म्हटले हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...