Home »TV Guide» Ritu Shivpuri Posted Old Topless Photo With Akshay

अॅक्ट्रेसने शेयर केला अक्षयबरोबरचा बोल्ड फोटो, TV शो मध्ये करतेय आईचा रोल

दिव्य मराठी वेब टीम | Aug 10, 2017, 08:53 AM IST

मुंबई - 'आंखे' (1993) चित्रपटात गोविंदाबरोबर मुख्य भूमिकेत असलेली अॅक्ट्रेस रितू शिवपुरी स्टार प्लसच्या 'इस प्यार को क्या नाम दूं 3' शोमध्ये लीड अॅक्ट्रेस शिवानी तोमरची आई 'इंद्राणी'च्या भूमिकेत झळकत आहे. रितूने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक टॉपलेस फोटो शेयर केला आहे. त्यात ती अक्षयबरोबर एका फोटोशूटमध्ये दिसत आहे. फोटोबरोबर रितूने लिहिले आहे, Akshay and me many many moons ago! रितूने शेयर केलेला फोटो प्रसिद्ध मॅगझिन 'सिनेब्लिट्झ'चा आहे.

नुकतेच केले हॉट फोटोशूट..
'इस प्यार को क्या नाम दूं 3' शोपूर्वी रितूने हॉट फोटोशूट केले होते. सर्व फोटोंमध्ये तिचा सिझलिंग लूक पाहायला मिळाल. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने फोटो शेयर केले होते. एका फोटोला तिने कॅप्शन दिले, 'Wear the attitude not the outfit!'.

दुसऱ्यांदा झळकणार टीव्हीवर
रितू दुसऱ्यांदा टीव्हीवर झळकत आहे. यापूर्वी ती अनिल कपूरच्या '24' शोच्या सिझन 2 मध्ये झळकली होती. अखेरच्या वेळी ती, 2006 मध्ये पंजाबी चित्रपट 'एक जिंद एक जान'मध्ये दिसली होती.

चित्रपटांतून ब्रेक घेत केले ज्वेलरी डिझाइन..
रितूने चित्रपटांतून ब्रेक घेतल्यानंतर ज्वेलरी डिझायनर म्हणून काम केले. 2014 मध्ये एका मुलाखतीत तिने पुनरागमनाचे संकेत दिले होते. तिने 'हम सब चोर है' (1995), 'आर या पार' (1997), 'भाई भाई' (1997), 'हद कर दी आपने' (2000), 'ऐलान' (2005) सह इतर चित्रपटांत काम केले आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, रितू शिवपुरीच्या फोटोशूटचे PHOTOS..

Next Article

Recommended