आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX: ऋतुराज ठरला \'इंडियाज रॉ स्टार\'चा विजेता, पाहा ग्रॅण्ड फिनालेतील गोहरची धमाल-मस्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(ट्रॉफीसोबत ऋतुराज मोहंती, गोहर खान)
मुंबईः 'इंडियाज रॉ स्टार' या सांगितिक रिअॅलिटी शोची अंतिम फेरी रविवारी पार पडली. ऋतुराज मोहंती या शोचा विजेता ठरला आहे. दर्शन रावल आणि मोहित गौर यांना मागे टाकत ऋतुराजने ही स्पर्धा आपल्या नावी केली.
'इंडियाज रॉ स्टार'च्या या संपूर्ण पर्वात ऋतुराजने आपल्या गायकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या शोमध्ये पाहुणे म्हणून आलेल्या सर्व गायकांनी ऋतुराजचे कौतुक केले आहे.
या शोच्या अंतिम फेरीत गायक कैलाश खेर, शान आणि मोहित चौहान परीक्षकाच्या भूमिकेत होते. याशिवाय अभिनेता अर्जुन कपूरची विशेष उपस्थिती या अंतिम फेरीमध्ये होती. ऋतुराजला पुरस्काराच्या रुपात ट्राफी, 50 लाख रुपये आणि मारुती स्विफ्ट कार मिळाली. या ग्रॅण्ड फिनालेत शोची होस्ट गोहर खान भरपूर धमाल करताना दिसली.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि छायाचित्रांमध्ये पाहा या ग्रॅण्ड फिनालेची खास झलक...