आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोट्या पडद्यावरच्या \'देवसेना\'ची आई होणार \'रोजा\'ची ही अॅक्ट्रेस, आता दिसते अशी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री मधू - Divya Marathi
अभिनेत्री मधू
1991 साली आलेल्या 'फूल और कांटे'द्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी अभिनेत्री मधू आता छोट्या पडद्यावरुन अभिनयात कमबॅक करत आहे. 24 जूनपासून स्टार प्लस वाहिनीवर सुरु होणा-या 'आरंभ'द्वारे 'देवसेना' अर्थातच कृतिका नायकच्या आईच्या भूमिकेत झळकणारेय. या मालिकेत त्यांच्यासोबत रजनीश दुग्गल आणि अभिनेत्री तनुजा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. यापूर्वी मधु 2004 साली 'देवी' या मालिकेत दिसली होती. मधूने 90च्या दशकात अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केले होते. विशेषतः तिला 'रोजा' (1992) या सिनेमासाठी ओळखले जाते. या सिनेमाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. 90च्या दशकापासून ते आतापर्यंत मधूच्या लूकमध्ये बराच बदल झाला आहे. 

या मालिकेत अॅक्शन करताना दिसणार मधू... 
'आरंभ' या मालिकेतील मधूची भूमिका 'बाहुबली' या सिनेमातील राणी 'शिवगामी'च्या भूमिकेशी साधर्म्य साधणारी आहे. सिनेमात शिवगामीची भूमिका अभिनेत्री  राम्या कृष्णनने साकारली होती. या सिनेमचे लेखक केवी विजयेन्द्र प्रसाद यांनीच आरंभ या मालिकेची कथा लिहिली आहे. रिपोर्ट्सनुसार, 45 वर्षीय मधू या मालिकेत अॅक्शन सीन्स करताना दिसेल. मधूने एका मुलाखतीत या भूमिकेविषयी सांगितले, "होय ही एक डायनॅमिक भूमिका आहे. यामध्ये मी राणीची भूमिका साकारतेय, जी संपूर्ण राज्यावर अधिराज्य गाजवते. राम्या माझी खूप चांगली मैत्रीण आहे आणि तिच्या भूमिकेशी साधर्म्य साधणारी भूमिका करण्याची संधी मिळाल्याने मी आनंदी आहे."

एक पीरियड ड्रामा
ही मालिका एक पीरियड ड्रामा असून, यामध्ये प्रेक्षकांना आर्यन आणि द्रविडियन युगाची कहाणी बघायला मिळेल. या मालिकेचे दिग्दर्शक सोनाली बेंद्रेचे पती गोल्डी बहल हे आहेत. मालिकेचे चित्रीकरण मुंबईतील फिल्मसिटी येथे  सुरु असून यासाठी 'बाहुबली' सिनेमातील सेटप्रमाणे भव्य सेट उभारण्यात आला आहे. आर्यन आणि द्रविडियन यांच्यातील शत्रुत्व आणि देवसेना-वरुणदेवची प्रेमकहाणी मालिकेत दाखवली जाणार आहे.  मालिकेतील देवसेनेची भूमिका बाहुबली या सिनेमातील अनुष्का शेट्टीच्या भूमिकेवरुन प्रेरित आहे. वरुणदेवच्या भूमिकेत रजनीश दुग्गल असून तो आर्यन्सचा योद्धा आहे. या मालिकेतून अभिनेत्री काजोलची आई तनुजा छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहेत.  

पुढील स्लाईड्सवर बघा, 'आरंभ' या मालिकेतील स्टार्सच्या लूकचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...