आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिकिनी फोटोबाबत अॅक्ट्रेस म्हणाली, अॅक्टर अॅब्स दाखवू शकतात तर मी का नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बालिका वधू (2012-15) आणि 'गंगा' (2016-17) सारख्या शोमध्ये झळकलेली रुप दुर्गापाल हिने नुकतेच सोशल मीडियावर तिचे बिकिनी फोटो शेअर केले आहेत. तिला याबाबत विचारण्यात आले त्यावेळी ती म्हणाली, मला बिकिनी परिधान करण्याचा किंवा शो ऑफ करण्याचा अधिकारी नाही का? जर अॅक्टर्स त्यांचे अॅब्ज दाखवू शकतात तर महिला त्यांची बॉडी का दाखवू शकत नाहीत. हे फोटो रुपच्या थायलंड व्हॅकेशनचे आहेत. 

लग्नाबाबतही बोलली.. 
- रुपचे लग्न झालेले आहे. पण तिने ही बाब सर्वांपासून लपवली होती. याबाबत बोलताना ती म्हणाली की, लग्न झालेल्या महिलेला काम मिळत नाही हे एक मिथ आहे. पण आता ते दिवस राहिले नाहीत. त्यामुळे मी कारणामुळे लग्न केल्याचे लवपले असे तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. 
- लग्न झालेले असल्याचे समजताच लोक विनाकारण तुमच्या खासगी आयुष्यात डोकवायला लागतात. तुम्हाला इतरांबरोबर लिंक केले जाऊ लागते. ते हानिकारक ठरू शकते. त्यांना तुमचे लग्न, मुलांबाब माहिती हवी असते. मला असे वाटत होते, की मी फक्त माझ्या कामातून बोलावे. त्यामुळे मी लपवत होते. 

लग्नही थाटले गुपचूप.. 
- जून 2016 मध्ये रुपने एका स्पोर्ट्स चॅनलचा क्रिएटिव्ह डायरेक्टर दीपक नेलवालशी विवाह केला होता. मात्र नंतर एका मुलाखतीत रुपने तिचे लग्न सिक्रेट नसल्याचे स्पष्ट केले होते. माझे लग्न अरेंज मॅरेज होते आणि जवळच्या लोकांच्या उपस्थितीत झाले होते, असे तिने सांगितले. 

आता झळकणार वारीसमध्ये.. 
- रुप बालिका वधूशिवाय 'गंगा', 'बाल वीर' (2012-13), 'अकबर बीरबल' (2015), 'स्वरागिनी: जोड़े रिश्तों की डोर' (2016) आणि 'कुछ रंग प्यार के ऐसे भी' (2016) अशा सिरियल्समध्ये झळकली आहे. लवकरच ती वारीसमध्येही झळकणार आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा रुप दुर्गापालने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरक शेअर केलेले इतर बिकिनी PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...