आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या टीव्ही मालिकेच्या सेटवर खर्च झाले तब्बल 3 कोटी, तयार व्हायला लागले 65 दिवस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - धार्मिक शो 'विघ्नहर्ता श्रीगणेश' 22 ऑगस्टपासून सुरु झाला आहे. या मालिकेची अभिमन्यू सिंहने Contiloe Picture Pvt Ltd बॅनरखाली निर्मिती केली आहे. या शोसाठी मुंबईपासून 25 किमी दूर नैगाव येथे 3.5 एकर जागेवर सेट लावण्यात आला आहे ज्यावर 2.5-3 कोटी रुपये खर्च आला आहे. सेट डिझायनर चोकस भारद्वाज यांनी  आमच्या प्रतिनीधींशी बोलताना काही गोष्टी शेअर केल्या आहेत. 
 
 चोकस यांनी याअगोदर  'सिया के राम' आणि 'देवों के देव...महादेव' या सेटचेही डिझाईन केले आहे.  'विघ्नहर्ता गणेश' च्या सेटबद्दल त्यांनी सांगितले की, हिंदू धर्मात शंकराला नेहमीच  योगीच्या स्वरुपात दाखवले गेले, याचमुळे त्यांना ऑडियंसने नेहमीच पर्वतावर ध्यान करताना पाहिले आहे. यामुळे मी काही वेळ कन्फ्युज होते कारण मला शंकाराच्या जीवनाचा दुसराल भाग दाखवायचा होता. मला शिव, पार्वती आणि गणेश या कुटुंबाच्या लाईफबद्दल लोकांना सांगायचे होते. मला यासाठी जुने मंदीर आणि आर्कीटेक्चरपासून प्रेरणा मिळाली.
 65 दिवसात तयार झाला सेट..
 - चोकस सांगतात की, हा सेट बनवण्यासाठी मला जवळपास 65 दिवसाचा वेळ लागला. देवी पार्वतीचा श्रृंगार कक्ष, गणपतीला खेळण्यासाठी जागा आणि शंकराच्या ध्यानासाठी जागा यांसारख्या सर्वच गोष्टींसाठी मी अभ्यास केला. निसर्गाचा विचार करुन मी सेट तयार केला.
 - आजच्या ऑडिएंसची मानसिकता विचारात घेऊन या सेटचे डिझाईन केले आहे.
 - चोकसने सांगितले की, जवळपास 15-20 लोकांनी सेट डिझाईन कॉन्सेप्टला पाहिले आणि त्याशिवाय पेंटर्स, कारपेंटर्स आणि वेल्डर्ससहीत 200-250 लोकांनी दररोज सेटचे काम पाहिले.
 
 अशी आहे स्टारकास्ट 
 - 'विघ्नहर्ता गणेश' मध्ये उजैर बसर भगवान गणेश, आकांक्षा पुरी देवी पार्वती, मलखान सिंह भगवान शिव, बसंत भट्ट कार्तिकेय आणि आनंद गोराडिया नारद मुनीच्या भूमिकेत दिसतील. 
 - हा शो धार्मिक शो 'संकटमोचन महाबली हनुमान'ला रिप्लेस करेल.
 
 पुढच्या स्लाईडवर पाहा, सेटवरील काही फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...