आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'छोटी बहू'ची बोल्ड स्टेप, बनली 'तृतीयपंथी', नाराज झाले कुटुंबीय, आई झाली शॉक्ड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः छोट्या पडद्यावरील 'छोटी बहू' अर्थातच अभिनेत्री रुबीना दिलाइकविषयी एक खास बातमी आहे, ती वाचून नक्कीच तुम्ही दंग व्हाल. रुबीना आता तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर)ची भूमिका साकारणारेय. छोटी बहूच्या नावाने प्रसिद्ध झालेली अभिनेत्री रुबीना दिलाइक 'शक्ती अस्तित्व के अहसास'मध्ये तृतीयपंथीची भूमिका साकारणारेय. या मालिकेतील तिच्या पात्राचे नाव सौम्या असून ती एक तृतीयपंथी आहे.

रुबीनाच्या या भूमिकेमुळे तिची आई झाली नाराज..
रुबीनाने उचलेल्या या पावलामुळे तिचे चाहते जरी खुश झाले असले, तरी तिचे कुटुंबीय मात्र तिच्यावर चांगलेच नाराज झाले आहे. रुबीनाने सांगितल्याप्रमाणे, या भूमिकेविषयी तिच्या आईला काहीच ठाऊक नव्हते. मीसुद्धा या ट्विस्टविषयी कुणाला काहीच सांगितले नव्हते. मात्र जेव्हा एपिसोड ऑन एअर झाला, तेव्हा आई बघून शॉक्ड झाली.

तृतीयपंथीची भूमिका साकारणे होते अतिशय चॅलेंजिग...
रुबीनाने सांगितल्याप्रमाणे, ''मी पूर्वीपासूनच अशा आव्हानात्मक भूमिकेच्या शोधात होती. तिच्या मते, ट्रान्सजेंडरची भूमिका साकारणे एक मोठे चॅलेंज होते.'' शोच्या निर्मात्या रश्मी शर्मा यांनी सांगितले, ''ही मालिका केवळ एक डेली सोप नसून यामध्ये एक सामाजिक संदेश आहे. तृतीयपंथी लोकांना सामान्यांप्रमाणे आयुष्य जगण्याचा हक्क आहे.''

अभिनेत्याला डेट करतेय रुबीना...
रुबीना दिलाइक अभिनेता अभिनव शुक्लासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. स्वतः रुबीनाने एका मुलाखतीत ही गोष्ट मान्य केली. रुबीनाने सांगितले, की या नात्याची सुरुवात काही महिन्यांपूर्वीच झाली आहे. 'छोटी बहू' या मालिकेच्या सेटवर दोघांची भेट झाली होती.

अभिनवने स्वीकारले नाते..
एका मुलाखतीत अभिनवने सांगितले, "माझी आणि रुबीनाची भेट गेल्यावर्षी गणपतीमध्ये एका मित्राच्या घरी झाली होती. मी तिला सोडायला तिच्या घरी गेलो होतो. साडीत ती खूप सुंदर दिसली होती. आम्ही गेल्या दीड वर्षांपासून एकमेकांना ओळखतोय."

अविनाश सचदेवसोबत रिलेशनशिपमध्ये होती रुबीना...
अभिनवपूर्वी रुबीना टीव्ही अभिनेता अविनाश सचदेवला डेट करत होती. दोघांचीही भेट 'छोटी बहू'च्या सेटवरच झाली होती. मात्र आता दोघांचे मार्ग विभक्त झाले आहेत.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, रुबीनाचे काही Photos...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...