आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या टीव्ही अभिनेत्याला डेट करतेय 'छोटी बहू', मुलाखतीत केले कबूल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : अभिनव शुक्ला आणि रुबीना दिलाइक
मुंबई- टीव्हीची 'छोटी बहू' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री रुबीना दिलाइक सध्या अभिनेता अभिनव शुक्लाला डेट करतेय. याचा खुलासा स्वत: रुबीनाने एका प्रतिष्ठीत वर्तमानपत्राला मुलाखत देताना केला आहे. रुबीनाच्या सांगण्यानुसार, त्यांच्या नात्याची सुरुवात काही महिन्यांपूर्वीच झाली आहे. दोघे एकमेकांना 'छोटी बहू' मालिकेपासून ओळखतात.
अभिनवसोबत लग्न करणार रुबीना...
रुबीनाला विचारण्यात आले, की ती आणि अभिनव लग्न कधी करणार आहेत. यावर ती म्हणाली, 'सध्या आम्ही आमचे आयुष्य एन्जॉय करतोय. नुकतेच आमचे रिलेशन सुरु झाले.'
अभिनवनेसुध्दा कबूल केले नाते-
एका मुलाखतीत अभिनवने सांगितले, 'रुबीनाशी माझी भेट मागील वर्षी गणेशोत्सवावेळी एका फ्रेंडच्या घरी झाली होती. मी तिला सोडण्यासाठी गेलो होतो. साडीमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. आम्ही एकमेकांना जवळपास दीड वर्षांपासून ओळखतो.'
कधीकाळी अविनाश सचदेवला करत होती डेट-
अभिनवपूर्वी रुबीना टीव्ही अभिनेता अविनाश सचदेवला डेट करत होती. दोघांनी भेट 'छोटी बहू' मालिकेच्या सेटवर झाली होती. मात्र नंतर अविनाश आणि रुबीनाचे नाते संपुष्टात आले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अभिनवसोबत रुबीनाचे काही फोटो...