आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonam Kapoor Approves Alia Bhatt As Arjun Kapoor\'s Girlfriend

इंटीमेट सीन्समुळे वाढली आलिया-अर्जुनमध्ये जवळीक, सोनमलासुध्दा पसंत आहे ही जोडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करीना कपूर खानने करण जोहरचा चॅट शो 'कॉफी विथ करण'मध्ये चुलत भाऊ रणबीर कपूरच्या उपस्थितीत कतरिना कैफला भाभी म्हणून स्वीकार केले होते. असेच काही दुस-या स्टार्सच्या बाबतीतही घडले आहे. ही घटना आहे अर्जुन कपूर आणि आलिया भट्ट यांच्याबाबतीत. त्या दोघांमध्ये काहीतरी शिजतय अशा चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये होत आहेत. या दोघांच्या नात्याला अर्जुनची चुलत बहीण सोनम कपूरने वास्तवरित्या स्वीकार केले आहे.
'2 स्टेट्स'मध्ये आलियासोबत काही इंटीमेट सीन दिल्यानंतर अर्जुन वास्तव आयुष्यातही तिच्या जवळ आला आहे. हे दोघे याला स्वीकारण्यास नकारत आहेत. परंतु कधी-कधी त्यांच्यात जवळीक वाढल्याचे दिसून येते. अलीकडे झालेल्या एका अवॉर्ड फंक्शनमध्ये आलियाने त्याला अशी जादू की झप्पी दिली जशी एखादी तरूणी आपल्या बॉयफ्रेंडला देतात. याविषयी अर्जुनला विचारले तर तो लाजला आणि मौन बाळगले.
तसे पाहता अर्जुनची बहीण सोनम याबाबतीत त्याच्यासोबत आहे असेच म्हणावे लागेल. ती नेहमी सांगत असते, की ती तिच्या सर्व भावांच्या खूप जवळ आहे. त्यांच्यासोबत ती मैत्रीच्या नात्याप्रमाणे वागते. सोनमला आलिया खूप आवडते आणि 'हायवे'च्या प्रशंसकांमध्ये एक नाव सोनमचेदेखील होते. परंतु सिनेमासोबत तिचा कोणताही संबंध नव्हता आणि ती आणि आलिया मैत्रिणीही नाहीयेत. तिने सिनेमाची गाणी आणि प्रोमो बघूनच आलियाची खूप प्रशंसा केली.
ऐकिवात आहे, की आलियाला कपूर घराण्यातील परफेक्शनिस्ट मुलगी पसंत करते. अर्जुन-आलिया यांच्या नात्याविषयी सोनम जास्त स्पष्ट बोलत नाहीये जेवढी करीना रणबीर आणि कतरिनाच्या नात्याविषयी बोलली होती. सोनम एवढेच म्हणाली, की 'मी माझ्या भावांच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप करत नाही.' सार्वजनिकरित्या सोनम त्यांच्या नात्याला स्वीकार करण्यापासून स्वत: वाचवत आहे असेच जाणवत आहे. परंतु सुत्रांच्या सांगण्यानुसार, अर्जुन आणि आलिया यांच्या नात्यावर तिने अनौपचारिकरित्या शिक्का मारला आहे.
'2 स्टेट्स' 18 एप्रिलला रिलीज होणार आहे. आलिया भट्ट आणि अर्जुन कपूर अभिनीत हा एक रोमँटिक ड्रामा सिनेमा आहे. सिनेमाची कहाणी लेखक चेतन भगतची कादंबरी '2 स्टेट्स'वर आधारित आहे. सिनेमात अर्जुन आणि आलियाने एका रोमँटिक जोडीची भूमिका साकारली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि अर्जुन आणि आलिया यांच्या '2 स्टेट्स' या आगामी सिनेमामधील त्यांच्या केमिस्ट्रीची झलक बघा...