आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'साथ निभाना साथिया'च्या या फेमस अॅक्ट्रेसचा झाला विनयभंग, दारुड्याने केले गैरवर्तन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः ‘स्टार प्लस वाहिनी’वरील एका गाजलेल्या मालिकेतील अभिनेत्रीचा विनयभंग झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेतील प्रतिभा तिवारी या अभिनेत्रीने तिची छेडछाड झाल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या मालिकेत अभिनेत्री प्रतिभा ‘नाइया’ची व्यक्तिरेखा साकारते. मुंबईत घडलेल्या या घटनेमध्ये एका मद्यधुंद इसमाने या अभिनेत्रीशी गैरवर्तन केल्याची माहिती मिळाली असून कांदिवली हायवे येथून प्रतिभा तिच्या हेअरड्रेसरसोबत जात असताना ही घटना घडल्याचे वृत्त हाती आले आहे.
एका सहकाऱ्याची प्रतिक्षा करत असताना तिथे मद्यधुंद अवस्थेतील एका इसमाने अचानक प्रतिभाशी बोलायला सुरुवात केली. दरम्यान, या व्यक्तिने प्रतिभासोबत असभ्य वर्तन केल्यामुळे तिने थेट त्या इसमाला पोलीस स्थानकाचा रस्ता दाखवत त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली. सदर प्रसंगाबाबत एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीमध्ये या अभिनेत्रीने ‘अशा’ प्रसंगी महिलांनी कोणत्याही परिस्थितीत पोलिसांत तक्रार दाखल केली पाहिजे, असे म्हणत शहराच्या इतक्या गजबजलेल्या ठिकाणी विनयभंगासारखी घटना घडणं ही खरंच संतापजनक बाब आहे, असे मतही अभिनेत्री प्रतिभा तिवारी हिने व्यक्त केले.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, प्रतिभा तिवारीची निवडक छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...