आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TVची संस्कारी \'गोपी बहू\' अडकली होती वादात, या कारणामुळे केली होती लोकांना शिवीगाळ!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः छोट्या पडद्यावरील गाजलेली मालिका 'साथ निभाना साथिया' तब्बल सात वर्षानंतर आता प्रेक्षकांचा निरोप घेतेय. मालिकेच्या घसरत्या टीआरपीमुळे निर्मात्यांनी मालिका गुंडाळण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे. देवोलिना भट्टाचार्जी या मालिकेत गोपी बहूच्या भूमिका साकारत आहे. देवोलिनापूर्वी अभिनेत्री जिया मानेक 'गोपी बहू'च्या भूमिकेत झळकली होती. या मालिकेनेच तिला लोकप्रियता मिळाली होती. मालिकेत संस्कारी बहूच्या भूमिकेत झळकलेली जिया मानेक 2012 साली हुक्काबारमध्ये आढळली होती. त्यावरुन बराच गोंधळ निर्माण झाला होता. 

2012 साली घडली होती घटना...
4 एप्रिल 2012 रोजी मुंबईतील विलेपार्लेस्थित कॉस्मिक रेस्टोबारमध्ये समाजसेवा शाखेच्या पोलिसांनी उशीरा रात्री छापा टाकला होता. या रेस्तराँमध्ये हुक्‍क्‍याचे सेवन करणाऱ्या 17 जणांना यावेळी  पोलिसांनी अटक केली होती. यात दोने मुलींचा समावेश आहे. या कारवाईच्यावेळी कुटुंबातील सदस्यांसह जेवायला आलेली जिया मानेकसुद्धा रेस्तराँमध्ये सापडली होती. यावेळी तिथे उपस्थित लोकांनी तिचे फोटो आणि व्हिडिओज काढण्याचा प्रयत्न केला होता. आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न करत असताना जियाचा तेथे उपस्थित कॅमेरामन आणि फोटोग्राफर्ससोबत वाद झाला होता. तिने त्यांना शिवीगाळसुद्धा केली होती.   

आईसोबत गेली होती रेस्तराँमध्ये..
जिया या रेस्तराँमध्ये तिची आई आणि काही नातेवाईकांसोबत जेवायसाठी आली होती. रात्री 11 च्या सुमारास पोलिसांनी तेथे छापा टाकला होता. मात्र, ती आणि तिचे नातेवाईक केवळ जेवणासाठी आल्याचे तिने पोलिसांना सादर केलेल्या बिलावरून स्पष्ट झाले होते. त्यामुळे पोलिसांनी तिला लगेचच सोडून दिले होते. पण या प्रकरणानंतर जिया बरेच दिवस चर्चेत राहिली होती. 

'नच बलिए'साठी सोडली होती  'साथ निभाना साथिया' ही मालिका...
'साथ निभाना साथिया' मालिकेत साकारलेल्या गोपी बहूच्या भूमिकेने जिया लोकप्रिय झाली. तिच्या अभिनयाची मोठी प्रशंसा झाली. पण झलक दिखला जा या शोमध्ये सहभागी होण्यासाठी जियाने या मालिकेतून काढता पाय घेतला होता. त्यानंतर तिच्यावर बरीच टीका झाली होती.  

पु़ढील स्लाईड्सवर जाणून घ्या, जियाविषयी बरंच काही आणि 9 व्या स्लाईड्सपासून बघा तिच्या घराचे खास Photos... 
 
बातम्या आणखी आहेत...