('डान्स प्लस'च्या सेटवर कतरिनै कैफ आणि सैफ अली खान)
मुंबई- सैफ अली खान आणि कतरिना कैफ 'फँटम' या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी 'डान्स प्लस' या रिअॅलिटी शोमध्ये पोहोचले होते. शोमध्ये या जोडीने सिनेमा प्रमोट करण्यासोबत स्पर्धकांसोबत धमाल-मस्तीसुध्दा केली.
शूटिंगदरम्यान कतरिना ब्लॅक अँड व्हाइट आऊटफिटमध्ये दिसली. तिने ISSA Londonचे ब्लाऊज आणि शर्ट स्कर्ट कॅरी केले. आपल्या लूकला तिने ZARA हिल्स, न्यूड लिप्स आणि साईड हेअरस्टाइलने पूर्ण केले. तसेच सैफ ब्लू टी-शर्ट आणि ब्लॅक जॅकेट आणि ब्लू पँट्समध्ये दिसला.
पत्रकारांशी बोलताना सैफ आणि कतरिनाने सांगितले, की त्याला हा शो खूप आवडला, त्यांनी स्पर्धकांना शुभेच्छासुध्दा दिल्या. कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसूजा शोचा परिक्षक असून राघव जुयाल होस्ट करत आहे. धर्मेश, शक्ती मोहन आणि सुमित नागदेव शोमध्ये मेंटर म्हणून काम करत आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'डान्स प्लस'च्या सेटवरील ON-LOCATION PHOTOS...