मुंबई: सैफ अली खान आपल्या आगामी 'हॅपी एंडिंग' सिनेमाच्या प्रमोशनसाठी सोमवारी (10 नोव्हेंबर) 'इंडियाज रॉ स्टार' या टीव्ही शोमध्ये पोहोचला होता. त्याच्यासोबत इलियाना डिक्रूज आणि कल्कि कोचलिनसुध्दा दिसून आली.
यावेळी इलियाना लेक क्रॉप टॉप आणि ब्राऊन स्कर्टमध्ये दिसली. इलियाना या ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसून आली. तसेच, कल्कि फ्लोरल मिडी ड्रेसमध्ये दिसली. सैफ पांढ-या रंगाच्या टी-शर्ट आणि ब्लू जीन्सच्या गेटअपमध्ये पोहोचला. त्याने ब्राऊन लेदर जॅकेट घातलेले होते. शोची होस्ट गोहर खानसुध्दा ग्लॅमरस लूकमध्ये दिसली. प्रमोशनदरम्यान शोच्या स्पर्धकांसोबत या स्टार्सनी धमाल-मस्ती केली.
'हॅपी एंडिंग'चे दिग्दर्शन राज निदिमोरू आणि कृष्णा डीकेने केले आहे. हा सिनेमा 21 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे.
करीना कपूर खान आणि प्रिती झिंटा या सिनेमात कॅमियोच्या भूमिकेत दिसतील.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'इंडियाज रॉ स्टार'च्या सेटवर पोहोचले 'हॅपी एंडिंग'चे स्टारकास्ट...