आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: आर्ची-परशासोबत माधुरी झाली झिंगाट, सेटवर क्लिक केले सेल्फी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘सो यू थिंक यू कॅन डान्स’च्या सेटवर क्लिक झालेली रिंकू-आकाशची खास झलक - Divya Marathi
‘सो यू थिंक यू कॅन डान्स’च्या सेटवर क्लिक झालेली रिंकू-आकाशची खास झलक
मुंबई : अवघ्या महाराष्ट्राला याडं लावणारे ‘सैराट’चे आर्ची आणि परशा सध्या छोट्या पडद्यारील कार्यक्रम, रिअॅलिटी शोमध्ये दिसत आहेत. नुकतीच ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेर लावल्यानंतर आता रिंकू-आकाशने माधुरी दीक्षित जज असलेल्या ‘सो यू थिंक यू कॅन डान्स’ या डान्स रिअॅलिटी शोमधल्या सगळ्यांनाच याडं लावले.

‘अँड टीव्ही’वरील या रिअॅलिटी शोमध्ये दोघांनी अक्षरश: धम्माल केली. या एपिसोडमध्ये स्पर्धकांनी 'सैराट'च्या गाण्यांवर बेभान होऊन डान्सही केला. आता आर्ची-परशा एकत्र आले आहे झिंगाट डान्स झाला नाही तरच नवल. या शोच्या सर्व परिक्षकांसोबत आर्ची-परशाने झिंगाट डान्स केला. या शोच्या निमित्ताने रिंकू-आकाशला माधुरी दीक्षितसोबत ठुमके लावण्याची संधी मिळाली. इतकेच नाही तर रिंकूने माधुरीसोबत मला जाऊ द्या ना घरी या मराठी लावणीवरही ठेका धरला.

या शोविषयी रिंकू म्हणाली, "मी माधुरी मॅमचे सिनेमे बघून लहानाची मोठी झाले. त्यांना अशी भेटण्याची संधी मिळेल, याचा मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. त्यांना भेटून मी खूप आनंदी आहे."
यावेळी रिंकू-आकाशने सिनेमातील त्यांचा गाजलेला डायलॉगसुद्धा बोलून दाखवला. तर पैलवान आकाशने शोचा होस्ट ऋत्विकला धोबीपछाड दिला. एकंदरीतच रिंकू-आकाशच्या उपस्थितीत रंगलेला ‘सो यू थिंक यू कॅन डान्स’चा ‘सैराट’ एपिसोड मिस करुन चालणार नाही हेच खरे...

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा, ‘सो यू थिंक यू कॅन डान्स’च्या सेटवर क्लिक झालेली रिंकू-आकाशची खास छायाचित्रे आणि सोबतच पाहा या शोच्या व्हिडिओची एक छोटीशी झलक...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...