आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: \'द कपिल शर्मा शो\'मध्ये झिंग झिंग झिंगाट, वाचा काय म्हणाले \'सैराट\'चे स्टार्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : नागराज मंजुळेच्या ‘सैराट’ सिनेमाने मराठीच नव्हे तर अमराठी प्रेक्षकांनाही वेड लावले आहे. या सिनेमाची भूरळ ‘कॉमेडी किंग’ कपिल शर्मालाही पडली आहे. म्हणूनच या शोच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या मराठी सिनेमाच्या टीमने हजेरी लावली आहे. कपिल शर्माने ‘सैराट’च्या संपूर्ण टीमला ‘द कपिल शर्मा शो’मध्ये आमंत्रित केले होते. या खास भागाचे शूटिंग रविवारी संध्याकाळी मुंबईत पार पडले. भरपूर धमाल-मस्तीत सैराट स्पेशल एपिसोडचे शूटिंग झाले.

'द कपिल शर्मा' शोमध्ये दिग्दर्शक नागराज मंजुळे, रिंकू राजगुरु, आकाश ठोसर, अरबाज शेख, तानाजी आणि संगीतकार द्वयी अजय-अतुल यांनी हजेरी लावली. यावेळी अजय-अतुल यांच्या जादूई स्वरांची अनुभती उपस्थितांना घेता आली. शिवाय झिंग झिंग झिंगाट.. या गाण्यावर कपिल शर्माने सर्व कलाकारांसोबत ताल धरला.

खरं तर आजवर कपिलच्या शोमध्ये बॉलिवूड सेलिब्रेटींची हजेरी असायची. शोमध्ये हिंदी सिनेमांचं प्रमोशन व्हायचं. मात्र ‘सैराट’च्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी सिनेमाच्या टीमने हिंदीतील सर्वात लोकप्रिय शोमध्ये आपली हजेरी लावली आहे. कपिल शर्मानेही या एपिसोडला मोठा रिस्पॉन्स मिळाल्याचे ट्विटरवरुन सांगितले. तसेच या प्रतिसादाबद्दल त्याने आभारही मानले.


पुढे वाचा, या शोविषयी काय म्हणाले सैराटचे स्टार्स आणि सोबतच बघा या एपिसोडच्या शूटिंगची एक्सक्लूझिव्ह छायाचित्रे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...