आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपिलच्या घरात झाले \'झिंग झिंग झिंगाट\', बघा \'परशा\'सोबत ताल धरतानाचा कपिलचा VIDEO

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बघा 'सैराट'च्या टीमसोबतचा कपिलचा झिंगाट डान्स... - Divya Marathi
बघा 'सैराट'च्या टीमसोबतचा कपिलचा झिंगाट डान्स...

एन्टरटेन्मेंट डेस्कः महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांनी रविवारी (१२ जून) रात्री नऊची वेळ एका खास कारणासाठी राखून ठेवली होती. निमित्त होते सोनी चॅनलवर प्रसारित झालेल्या ‘द कपिल शर्मा शो’चे. या शोमध्ये बॉक्स ऑफिसवर ८५ कोटींची कमाई करणा-या 'सैराट'च्या टीमची खास उपस्थिती होती.

'द कपिल शर्मा शो'मध्ये यावेळी पहिल्यांदाच एखाद्या मराठी सिनेमाचे प्रमोशन करण्यात आले. सैराट सिनेमाने अनेक विक्रम मोडित काढले. या शोची भूरळ कपिल शर्मालासुद्धा पडली आणि त्याने नागराज मंजुळे आणि त्यांच्या टीमला आपल्या शोमध्ये खास आमंत्रित केले होते. या शोमध्ये काय धम्माल पाहायला मिळणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. या कार्यक्रमात आर्ची, परशासोबत लंगड्या आणि सल्याने सर्वांनीच भरपूर धमाल केली. शिवाय अजय-अतुल यांच्या स्वरांची जादूही प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली.

आता 'सैराट'ची टीम कपिलच्या शोमध्ये आली आणि त्यांनी 'झिंग झिंग झिंगाट' या गाण्यावर ताल धरला नसेल तरच नवल. परशा, सल्या आणि लंगड्यासह कपिल शर्मासुद्धा बेधुंद होऊन झिंगाटवर थिरकला. एकंदरीतच 'द कपिल शर्मा शो'चा रविवारचा 'सैराट' स्पेशल एपिसोड चांगलाच गाजला.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, 'द कपिल शर्मा शो'च्या 'सैराट' स्पेशल एपिसोडची खास झलक छायाचित्रांमध्ये...