आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधी MMS तर कधी अनवाँटेड प्रेग्नेंसी! असे आहे या मॉडेलचे कॉन्ट्रोव्हर्शिअल Life

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साक्षी प्रधान - Divya Marathi
साक्षी प्रधान

मुंबईः 'बिग बॉस'चे दहावे पर्व 16 ऑक्टोबर पासून सुरु झाले आहे. प्रत्येक सीझनमध्ये शोला वादाची किनार लागत असते. सध्या आपण बोलुयात, बिग बॉसच्या चौथ्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या मॉडेल साक्षी प्रधानविषयी. शोदरम्यान साक्षी प्रेग्नेंट असल्याची बातमी आली होती. इतकेच नाही तर प्रेग्नेंसीमुळे साक्षीला शोमधून बाहेर पडायचे होते. यासाठी तिने बिग बॉसला इविक्शन मागितले होते. साक्षीची मागणी पूर्णसुद्धा झाली होती.

कशी आली प्रेग्नेंसीची बातमी...
बिग बॉसच्या घरात साक्षीला हवं तेव्हा डॉक्टरांसोबत कन्सल्ट करण्याची परवानगी देण्यात आली होती. यावरुनच ती प्रेग्नेंट असल्याची बातमी समोर आली होती. इतकेच नाही तर तिने श्वेता तिवारी, वीणा मलिक आणि सारा खानला तिची मासिक पाळी चुकल्याचेही शोमध्ये सांगितले होते. मासिक पाळी न आल्याने अनवाँटेड प्रेग्नेंसीची भीती तिला सतावत होती.
मात्र शोमधून बाहेर पडल्यानंतर तिचे म्हणणे काही वेगळेच होते. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत साक्षीने प्रेग्नेंसीची बातमी खोटी असल्याचे म्हटले होते. ती म्हणाली होती, मी आता फक्त 21 वर्षांची आहे. मला माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचे आहे. मी प्रेग्नेंट कशी असू शकते.

'स्प्लिट्सविला' जिंकल्यानंतर आली होती चर्चेत...
साक्षी प्रधान 'स्प्लिट्सविला' या डेटिंग रिअॅलिटी शोच्या दुस-या पर्वाची विजेती आहे. इतकेच नाही तर तिचा एक एमएमएस लीक झाला होता. या व्हिडिओत साक्षी एका तरुणासोबत इंटीमेट होताना दिसली होती. याच कॉन्ट्रोव्हर्सीमुळे साक्षीला बिग बॉस या शोची ऑफर मिळाली होती. बिग बॉसमध्ये साक्षी अभिनेता अश्मित पटेलला पॉप्स म्हणून हाक मारायची. स्वतःला ती अश्मितची मुलगी म्हणायची.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, साक्षी प्रधानचे काही PHOTOS...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...