आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'बिग बॉस'च्या घरात होणार युवराज, हरभजन आणि श्रीसंथची एन्ट्री !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'बिग बॉस' या रिअ‍ॅलिटी शोचा होस्ट सलमान खानने या शोच्या माध्यमातून सर्वाधिक महागडा होस्ट होण्याचा रेकॉर्ड बनवला आहे. सलमानच्या रेकॉर्डनंतर आता यंदाच्या पर्वात स्पर्धकांच्या बाबती हा शो नवीन रेकॉर्ड बनवण्याच्या तयारीत दिसत आहे. यंदाच्या पर्वात क्रिकेटर्सना सहभागी करुन घेण्याचा प्रयत्न निर्माते करत आहेत. यामध्ये युवराज सिंह, हरभजन सिंह आणि श्रीसंथ यांच्या नावांचा समावेश आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या शोच्या निर्मात्यांनी क्रिकेटर युवराज सिंह, हरभजन सिंह, आणि श्रीसंथ यांच्यासमवेत चंकी पांडे, नवीन बजाज, मनीषा कोईराला, आदित्य पांचोली, सूरज पांचोली, सुशील कुमार, पूनम पांडे, रबिया अमीन, धर्मेंद्र, शर्लिन चोप्रा आणि करण जोहर यांच्याशी संपर्क साधला आहे.

पुढे वाचा, कॅन्सरवर मात करणा-या युवी आणि मनीषा कोईराला मिळू शकते संधी...