अभिनेता सलमान खान आणि सोनम कपूर यांनी मंगळवारी लाइफ ओके वाहिनीच्या 'प्रेम की दीवाली' या प्री-दीवाली सेलिब्रेशनच्या कार्यक्रमाचे शूटिंग केले. लवकरच 'प्रेम रतन धन पायो' या सिनेमात दिसणारी ही जोडी येथे मस्तीच्या मूडमध्ये दिसली. सलमान ब्लॅक पठानीत तर सोनम लहेंगा चोलीत दिसली. इव्हेंटमध्ये सोनम मुलांसोबत एका रथावर स्वार होऊन मंचावर आली. तेव्हा या रथाला सलमान खान चक्क धक्का लावताना दिसला. त्याने या मुलांसोबत डान्सही केला.
सलमान-सोनम यांच्या व्यतिरिक्त अनेक स्टार्स प्रेम की दीवाली या कार्यक्रमात सहभागी झाले होते. करिश्मा तन्ना, राघव जुयाल, अनिता हसनंदानी, मुक्ती मोहन, एली अवराम, अक्षत सिंह, संजय सेठ, लता सेठ, प्रीतिका राव, शमिता शेट्टीसह अनेक सेलेब्स या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'प्रेम की दीवाली'चे Inside Photos...