मुंबई - शनिवारी सलमानने सुनील ग्रोवर, अली असगर, सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले यांच्यासोबत 'सुपर नाइट विद ट्यूबलाइट' या शो चे शूट केले. यावेळी सलमान खान, भाऊ सोहेल खान आणि 'नागिन २' ची अभिनेत्री मौनी रॉयही दिसून आली. या शो चा उद्देश 'ट्युबलाईट' चित्रपटाला प्रमोट करणे असा होता. ट्युबलाईट चित्रपट 23 जून रोजी प्रदर्शित होत आहे. या शो चे अनेक प्रोमो आतापर्यंत दाखविण्यात येत आहेत. हा शो येत्या रविवारी ऑन एअर होणार आहे. दोन तासांचा हा शो असणार आहे.
'द कपिल शर्मा...' च्या जागी येणार हा शो..
- 'सुपरनाइट विद ट्यूबलाइट' 18 जून (रविवार) रात्री 9 वाजता टेलिकास्ट करणार आहेत. म्हणजेच या दिवशी कपिल शर्मा शो येणार नाही.
- 16 मार्च ला ऑस्ट्रेलिया टूर वरुन परत येताना फ्लाईटमध्ये कपिल आणि सुनील चे भांडण झाले होते. यानंतर सलमान खानने कपिल ला त्याच्या स्टारडमवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला होता.
- आता सलमानने या शो चे प्रमोशन केल्यानंतर अशी चर्चा आहे की सलमानने कपिल च्या शो मध्ये न जाता सुनील च्या शो ला हजेरी लावली. याचेच कारण सलमानही कपिल वर नाराज आहे असे दिसते.
पुढच्या स्लाईडवर पाहा, 'सुपरनाइट विद ट्यूबलाइट' चे काही फोटोज्..