आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्ही शोमध्ये सलमानला अचानक कोसळले रडू, बघा छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचा 'दबंग' अभिनेता सलमान खानला तुम्ही नेहमीच हसताना बघितले आहे. सलमान ख-या आयुष्यात आणि पडद्यावरील आयुष्यातसुध्दा हसताना दिसतो. चाल आज आम्ही तुम्हाला दाखवतो की सलमान कसा हसता-हसता रडायला लागला होता. सलमान त्याची को-स्टार डेजी शाहसोबत 'जय हो' सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी 'डान्स इंडिया डान्स' रिअलिटी शोमध्ये गेला होता. सुरूवातीला सलमानने खूप धमाल केली. परंतु जेव्हा डीआईडीच्या स्पर्धकांनी सलमानच्या हिट गाण्यांवर परफॉर्मन्स देण्यास सुरूवात केली तेव्हा सलमानच्या डोळ्यात अश्रु आले.
मनन आणि सुमेधचे परफॉरमन्स बघून सलमानचा रडण्यावर ताबा राहिला नाही आणि त्याला स्टेजवरच रडू कोसळले. डीआईडीच्या तिन्ही परिक्षकांपैकी एक परिक्षक मुदस्सरला सलमानचे अश्रु बघून त्याच्या करिअरचे ते दिवस आठवले जेव्हा तो बॉलिवूडमध्ये काम शोधत होता. त्यावेळी सलमान खानने त्याची मदत केली होती. मुदस्सरने सलमानचे त्या मदतीसाठी आभार मानले.
सलमानला स्टेजवर रडताना बघून त्याची को-स्टार डेजी शाहच्यासुध्दा डोळ्यात पाणी आले होते. सलमान आणि डेजीचा 'जय हो' सिनेमा 24 जानेवारीला रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्वर बघा डीआईडीच्या स्टेजवर सलमान आणि डेजीचे काही निवडक छायाचित्रे...