मुंबई - 'बिग बॉस 11' चा पहिला प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. त्यात सलमान खान लोअर आणि टी-शर्ट परिधान करून घरातील झाडांना पाणी देत असल्याचे दिसत आहे. सोबतच तो गाणे गुणगुणत असल्याचेही दिसत आहे.
शेजारच्या भाभीला म्हणाला, तुम्ही सिंगल असता तर केले असते लग्न..
- प्रोमोमध्ये दिसते की, खालच्या अंकलला घाबरून सलमान जेव्हा मागे सरकतो, तेव्हा शेजारची भाभी त्याला म्हणते, लग्न झाले असते, तर कामं करायला तिने मदत केली असती.
- त्याचे उत्तर सलमान मस्ती करतच देतो. तो म्हणतो, तुम्हाला एवढी घाई का होती.. तुम्ही सिंगल असता तर झाले असते लग्न.
- सलमानची मस्करी पाहून भाभी लाजते आणि त्याला बेशरम म्हणून निघून जाते.
- व्हिडीओत सलमानने बिग बॉसचा 11 वा सिझन लवकरच येत असल्याचे म्हटले आहे.
एक ऑक्टोबरपासून सुरू होणार का 'बिग बॉस'.. वाचा पुढील स्लाइड्सवर...