आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानच ‘बिग बॉस’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'बिग बॉस' सीझन 7 मध्ये सलमानऐवजी शाहरुख खान दिसणार असल्याची अफवा मुंबईच्या गलीबोळात पसरली होती. मात्र, या कार्यक्रमाचा होस्ट सलमानच असल्याचे चॅनलचे म्हणणे आहे.

कलर्स चॅनलच्या एका अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, ''सलमान या कार्यक्रमाशी पहिल्यापासून जोडलेला आहे. सलमान खानशिवाय आम्ही इतर कोणाचाही विचार करू शकत नाही. आम्ही दोन वेगवेगळे ब्रँड असूनही एकत्र काम करत आहोत. सलमानमुळेच आमच्या कार्यक्रमाला आणि चॅनलला खूप फायदा झाला आहे. सलमाननेदेखील या कार्यक्रमाद्वारे घराघरांत आपले नाते जोडले आहे. त्याचा स्वभाव शोसाठी खूप फायद्याचा ठरला. त्यामुळे आम्ही त्याला कोणत्याही किंमतीत गमवणार नाही. शाहरुखसोबत दुसर्‍या गोष्टीवर चर्चा झाली असेल. मात्र, बिग बॉससंबंधी शाहरुखशी काहीच चर्चा झालेली नाही. आम्हाला माहीत नाही ही बातमी कोणी आणि का पसरवली. सलमानमुळेच 'बिग बॉस'ला ताकद मिळाली आहे आणि सलमानशिवाय लोकही 'बिग बॉस' पाहणार नाहीत.''