आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनमला हवाय धनुषसारखा ‘रांझणा’

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडची स्टायलिस्ट सोनम कपूर दक्षिणेच्या सुपरस्टार धनुषच्या व्यक्तिमत्त्वावर फिदा झाली आहे. ‘रांझणा’ सिनेमात ती धनुषबरोबर येत आहे. धनुष खूपच सरळ, साधा आणि प्रामाणिक असल्याचे तिचे म्हणणे आहे. एवढेच नव्हे तर आपल्या मिस्टर राइटमध्येसुद्धा असेच गुण असायला हवेत, असे तिचे म्हणणे आहे.

एका मुलाखतीत तिने सांगितले की, आतापर्यंत तिला अनेक प्रस्ताव मिळालेले आहेत. मात्र, त्यात मनाला भावेल, असा एकही नाही. शालेय जीवनात एका मुलाने तिला रक्ताने लिहून एक प्रेमपत्र पाठवले होते. त्यावर सोनम त्या मुलाला खूप रागावली होती. अशा प्रकारचे उद्योग करणारे लोक आपल्याला आवडत नसल्याचे ती म्हणते. शिवाय सध्या माझ्या आयुष्यात कोणी नाही. मात्र, जेव्हा येईल तेव्हा धनुषसारखाचा असायला हवा.

धनुष मात्र स्वतःला इतका मोठा समजत नाही. त्याचे म्हणणे आहे की त्याची पत्नी ऐश्वर्या त्याला परफेक्ट समजत नाही. त्यामुळे तो तिला इम्प्रेस करण्याचा नको तो प्रयत्न करत असतो.

आनंद ए. राय दिग्दर्शित 'रांझणा' सिनेमा येत्या 21 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाला ए.आर. रहमान यांनी संगीत दिले आहे. या सिनेमात सोनम कपूर, धनुषबरोबरच अभय देओलचीदेखील मुख्य भूमिका आहे.