आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FIRST LOOK: सलमान पोहोचला स्वर्गात, करतोय अप्सरांसोबत मजा-मस्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'बिग बॉस' या भारतातील लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शोच्या नव्या पर्वात प्रेक्षकांना अनेक ट्विस्ट बघायला मिळणार आहे. या शोचे नवे पर्व लवकरच कलर्स वाहिनीवर प्रसारित होणार आहे. या नव्या पर्वात प्रेक्षकांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा बरेच काही वेगळे बघायला मिळणार आहे.
मागील पर्वाप्रमाणेच हे पर्वसुद्धा बॉलिवूडचा 'दबंग' सलमान खान होस्ट करणार आहे. या शोच्या प्रोमोजचे शूटिंग नुकतेच पार पडले. या पर्वाच्या फर्स्ट लूकमध्ये सलमान खान डबल रोलमध्ये झळकणार आहे.
यावेळी सलमान एंजल आणि डेविल या दोन रुपात झळकणार आहे. या पर्वात प्रेक्षकांना स्वर्ग आणि नरक बघायला मिळणार आहे. शोचे प्रोमो लवकरच छोट्या पडद्यावर प्रसारित होणार आहेत. यामध्ये सलमान एकीकडे एंजल्सबरोबर फिरताना दिसतोय तर दुस-या रुपात सलमानने डेविलचे रुप घेतले आहे. सलमानचे हे रुप प्रेक्षकांना न‍िश्चितच आवडेल.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा सलमानचा हेवन आणि हेल अवतार...