आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Boss: मॉडेल, वादग्रस्त संन्यासी आणि युवीची वहिनी, हे आहेत 15 स्पर्धक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोपमुद्रा राऊत, ओमजी महाराज आणि भाऊ जोरावर आणि वहिनी आकांक्षा शर्मासोबत युवराज सिंह - Divya Marathi
लोपमुद्रा राऊत, ओमजी महाराज आणि भाऊ जोरावर आणि वहिनी आकांक्षा शर्मासोबत युवराज सिंह

मुंबईः रविवारी रात्री 'बिग बॉस'चे दहावे पर्व मोठ्या जल्लोषात सुरु झाले. नवीन पर्वात सलमान काही टुरिस्टसोबत टूर बसने बिग बॉसच्या घरात पोहोचला. स्वतः गाइड बनून सर्व टुरिस्ट्सना घराची झलक दाखवली. सलमानने शोच्या जुन्या फाइट्स आणि लव्ह स्टोरीजनाही उजाळा दिला. सलमानच्या डान्ससोबत झाली दहाव्या पर्वाची सुरुवात...

सलमानने शोच्या दहाव्या पर्वाची सुरुवात त्याच्या गाजलेल्या 'सुल्तान' या सिनेमातील टायटल साँगवर डान्स करुन केली. परफॉर्मन्सनंतर त्याने शोच्या स्पर्धकांची ओळख करुन दिली. पहिल्या स्पर्धकाच्या रुपात स्वामी ओमजी महाजारांनी मंचावर एन्ट्री घेतली. ओमजी सन्यांसी असून देशात रामराज्य आणण्याची त्यांची इच्छा आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, ते 22 ते 24 तास लोकांच्या सेवेत घालवतात. एका न्यूज चॅनलमध्ये लाइव्ह डिबेटच्या वेळी एका साध्वीसोबत हाणामारी केल्याने ओमजी महाराज 2015 मध्ये अचानक प्रकाशझोतात आले होते.

दुसरी स्पर्धक ठरली लोपमुद्रा
मॉडेल आणि अभिनेत्री लोपमुद्रा राऊत बिग बॉसची दुसरी स्पर्धक बनली. 2016 मध्ये मिस युनाइटेड कॉन्टिनेंट्समध्ये लोपमुद्रा सहभागी झाली होती.
तिसरा स्पर्धक बनला मनवीर गुर्जर
नोएडाचा रहिवाशी मनवीर गुर्जरने तिस-या स्थानावर शोमध्ये एन्ट्री घेतली. 29 वर्षीय मनवीर डेअरी फार्म चावलतो.

चौथी स्पर्धक नितिभा कौल
गुगल इंडियामध्ये काम करणा-या नितिभा कौलने चौथ्या क्रमांकावर शोमध्ये एन्ट्री घेतली. 23 वर्षीय नितिभा दिल्लीची रहिवाशी आहे. ती मुळची काश्मिरी आहे. नोकरी सोडून शोमध्ये सहभागी झाल्याचे नितिभाने यावेळी सांगितले.

पाचवा स्पर्धक अभिनेता रोहन मेहरा
टीव्ही अभिनेता रोहन मेहरा 'ये रिश्ता क्या कहलता है' या मालिकेतील नक्ष सिघांनियाच्या भूमिकेसाठी ओळखला जातो. तो बिग बॉसचा पाचवा स्पर्धक बनला.
सहावी स्पर्धक बाणी
बाणीचे खरे नाव गुरबाणी जज आहे. चंदीगडची रहिवाशी असलेली बाणी रोडीजच्या चौथ्या पर्वात सहभागी झाली होती. अनेक शोज होस्ट केल्यानंतर विकास गुप्तांच्या रानी महल या सिनेमाद्वारे तिने मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेतली आहे.

सातवी स्पर्धक लोकेश कुमारी
दिल्लीची रहिवाशी लोकेश कुमारी बिग बॉसची सातवी स्पर्धक ठरली. 25 वर्षीय लोकेश विद्यार्थिनी आहे.

'ये रिश्ता क्या कहलाता है'चा नैतिक ठरला आठवा स्पर्धक
करण टीव्ही अभिनेता असून 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतील नैतिकच्या भूमिकेसाठी ओळखला जातो. तो बिग बॉसच्या दहाव्या पर्वातील आठवा स्पर्धक ठरला.
नववी स्पर्धक आकांक्षा शर्मा
25 वर्षीय आकांक्षा शर्मा गुडगावची आहे. क्रिकेटर युवराज सिंहचा धाकटा भाऊ जोरावरसोबत तिचे लग्न झाले होते. मात्र लग्नाच्या चार महिन्यांतच ती माहेरी परतली. आकांक्षाने सांगितल्याप्रमाणे, तिला अद्याप घटस्फोट मिळालेला नाहीये. मात्र लवकरात लवकर तिला या लग्नाच्या बंधनातून मुक्त व्हायचे आहे.

दहावी स्पर्धक बनला जयपूरचा मनू पंजाबी
मनू पंजाबीचे पूर्ण नाव मनोज पंजाबी आहे. जयपूरमध्ये जिथे तो राहतो, तेथील लोक त्याला हीरो म्हणत असल्याचे त्याने सांगितले.
गौरव चोप्रा ठरला 11 वा स्पर्धक

गौरव चोप्रा
'उतरन' मालिकेत रघुवेंद्र प्रताप राठौरच्या भूमिकेसाठी ओळखला जाणारा गौरव एका हॉलिवूड सिनेमामध्ये झळकला आहे. 'जरा नचके दिखा' आणि 'नच बलिए 2' या डान्सिंग रिअॅलिटी शोजमध्येही गौरवने काम केले आहे. गौरव बिग बॉसच्या घरातील 11 वा स्पर्धक आहे.

12 वी स्पर्धक बनली प्रियांका जग्गा
प्रियांका जग्गा 32 वर्षांची असून दिल्ली बेस्ड मार्केटिंग रिक्रुटर आहे. प्रियांकाचे लव्ह मॅरेज असून ती दोन मुलांची आई आहे.

13 वा स्पर्धक ठरला राहुल देव
राहुल देव हा बॉलिवूड अभिनेता आणि मॉडेल आहे. त्याने 2000 मध्ये 'चॅम्पिअन' सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 'आन : मॅन अॅट वर्क', 'फाइट क्लब' आणि 'एक पहेली लीला' या सिनेमांमध्ये व्हिलनचे काम केले आहे. शिवाय 'देवों के देव महादेव' या मालिकेत त्याने अरुणासूरची भूमिका साकारली होती. बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल मुग्धा गोडसेसोबत राहुल देव रिलेशनशिपमध्ये आहे.
14 वा स्पर्धक बिहारचा नवीन
नवीन प्रकाश 26 वर्षांचा आहे. तो त्याच्या घरातील थोरला मुलगा असून शिक्षक आहे. आता तो कोलकातामध्ये वास्तव्याला आहे.

भोजपुरी सिनेमांची सुपरस्टार ठरली 15 वी स्पर्धक
भोजपुरी सिनेमांची सुपरस्टार मोनालिसा उर्फ अंतरा बिस्वास शोची 15 वी स्पर्धक ठरली. अंतराने सांगितल्याप्रमाणे, तिने तिच्या करिअरमध्ये आत्तापर्यंत 100 सिनेमांमध्ये काम केले आहे.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, बिग बॉसच्या सर्व स्पर्धकांचे Photos...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...