आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'झलक...'मध्ये माधुरीबरोबर सलमानची मस्ती, बघा कशी झाली धमाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सहसा बॉलिवूड सेलिब्रिटी आपल्या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने स्मॉल स्क्रिनवरील डेली सोप किंवा एखाद्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये हजेरी लावत असतात. मात्र सलमानची गोष्टच न्यारी आहे.
आपल्या आगामी 'बिग बॉस 7' या रिअ‍ॅलिटी शोच्या प्रमोशनच्या निमित्ताने सलमान अलीकडेच 'झलक दिखला जा'च्या सेटवर पोहोचला. सलमानचा हा शो येत्या 15 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.
त्यामुळे सलमानने आत्तापासूनच या शोचे प्रमोशन सुरु केले आहे. शोची जज माधुरी दीक्षित आणि सलमान खान यांची जबरदस्त केमिस्ट्री यावेळी बघायला मिळाली. सेटवरच्या फावल्या वेळेत सलमान माधुरीबरोबर गप्पा मारण्यात दंग दिसला. याशिवाय त्याने माधुरीबरोबर ठुमकेही लावले. सलमान स्पेशल 'झलक दिखला जा'चा हा एपिसोड 1 सप्टेंबरला प्रसारित होणार आहे.
बघा या शोमध्ये पोहोचलेल्या सलमानची धमाल...