आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan Proposed Katrina Kaif During Bigg Boss Finale

BB9: सलमानने घेतला कॅटसोबत सेल्फी, म्हणाला, 'मी आजही तुझा दीवाना'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तब्बू, आदित्य रॉय कपूर आणि कतरीनासोबत सेल्फी घेताना सलमान खान - Divya Marathi
तब्बू, आदित्य रॉय कपूर आणि कतरीनासोबत सेल्फी घेताना सलमान खान
मुंबई- कतरिना कैफ रिअॅलिटी शो 'बिग बॉस 9'च्या फिनालेमध्ये पोहोचली. यदरम्यान सलमानने तिच्यासोबत सेल्फी घेतला आणि कबूल केले, की तो आजही तिच्या दीवाना आहे. कतरिनाची स्टेजवर एंट्री होताच सलमानने तिला विचारले, 'कतरिना, तू खूप स्ट्राँग आहेत. संपूर्ण हिंदुस्तान तुझा दीवाना आहे.' रणबीर कपूरपूर्वी सलमान कतरिनाचा बॉयफ्रेंड होता.
आदित्य रॉय कपूरसुध्दा होता कॅटसोबत...
- 'बिग बॉस'च्या फिनालेमध्ये आदित्य रॉय कपूरसुध्दा कतरिनासोबत पोहोचला होता.
- दोन्ही स्टार्स येथे 'फितूर' सिनेमाला प्रमोट करण्यासाठी पोहोचले होते.
- कतरिना आणि आदित्यने शोमध्ये सिनेमाच्या गाण्यावर परफॉर्म केले.
- अभिषेक कपूर दिग्दर्शित हा सिनेमा 12 फेब्रुवारीला रिलीज होतोय.
सलमानच्या सल्ल्यानंतर कतरिनाने केले रणबीरसोबत ब्रेकअप?
- मागील काही दिवसांपासून माध्यमांत रणबीर आणि कतरिना यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या आहेत.
- बातमी अशीही आली होती, की रणबीरसोबत ब्रेकअप करण्यापूर्वी कतरिना सलमानला भेटली होती.
- दोघांनी दोन तास गप्पा मारल्या होत्या. त्यानंतर कॅटने रणबीरपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
- मागील दिवसांत अचानक बातमी आली होती, की रणबीरने कार्टर रोड स्थित फ्लॅट सोडला आहे. या फ्लॅटमध्ये ती रणबीरसोबत मागील 6 महिन्यांपासून लिव्ह-इनमध्ये राहत होती.
- येथून दोघांच्या ब्रेकअपच्या बातम्यांना उधाण आले.
- त्यानंतर divyamarathi.comच्या फोटोग्राफरने दोघांच्या कार वेगवेगळ्या ठिकाणी पार्क केल्याचा फोटोसुध्दा क्लिक केला होता.
- रणबीर कपूरची बाईक आणि कार मुंबईच्या विलसन अपार्टमेंटबाहेर दिसली होती.
- हे अपार्टमेंट रणबीरची आई नीतूने खरेदी केलेली प्रॉपर्टी आहे.
- कतरिना कैफची कार गुलदेव नगरच्या एका अपार्टमेंटमध्ये पार्क केलेली दिसली.
- रणबीरसोबत कार्टर रोड स्थित फ्लॅटमध्ये शिफ्ट होण्यापूर्वी कतरिना येथे राहत होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'बिग बॉस'च्या फिनालेमध्ये पोहोचलेल्या कतरिनाचे काही फोटो...