आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: 'कॉमेडी नाइट्स...' मध्ये सलमानने केला शाहरुखचा खोटारडेपणा उघड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः सुपरस्टार सलमान खानने आपल्या आगामी 'बजरंगी भाईजान' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी अलीकडेच 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'च्या सेटवर हजेरी लावली होती. यावेळी सलमानने शाहरुख खानचा खोटारडेपणाच उघड केला. झाले असे, की कपिलने त्याला शाहरुखचे 'कॉमेडी नाइट्स..'च्या सेटवरील एक जुनी व्हिडिओ क्लिप दाखवली. यामध्ये शाहरुख त्याच्या 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या सिनेमाच्या प्रीमिअरवेळीचा एक किस्सा सांगत होता.
क्लिपमध्ये शाहरुख कपिलला सांगतोय, ''निर्माते रतन जैन ('बाजीगर' सिनेमाचे निर्माते) आणि सलमान खान यांच्यासोबत मी 'डीडीएलजे' सिनेमा बघत होता. जेव्हा सिनेमात 'यदि यह लड़की मुझसे प्यार करती है तो पलटकर देखेगी...पलट...पलट...पलट', देखेगी...पलट...पलट...पलट', हा सीन येतो, तेव्हा रतन जैन मला म्हणाले, की हा सिनेमा फ्लॉप जाईल. हे ऐकून मी दुःखी झालो. मात्र सलमान एकमेव असा अभिनेता होता, ज्याने हा सिनेमा सुपरहिट होईल असे म्हटले होते. हा सिनेमा 'मैंने प्यार किया'पेक्षाही हिट होईल असे म्हणून त्याने मला धीर दिला होता."
संपूर्ण क्लिप बघितल्यानंतर सलमान म्हणाला, 'डीडीएलजे' हिट होईल, असे म्हटले होते, मात्र 'मैंने प्यार किया' पेक्षा जास्त हिट होईल असे नव्हते म्हटले. खरं तर सलमानने हे हसत हसत म्हटले.