आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan Threatens To Leave Bigg Boss 8 Due To Diandra Pregnancy

प्रेग्नेंट डिआंड्रा Bigg Bossमधून Out, सलमानने दिली शो सोडण्याची धमकी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('बिग बॉस'मधून आऊट झाल्यानंतर सलमान खानसोबत डिआंड्रा)
मुंबई- टीव्ही पर्सनालिटी आणि मॉडल डिआंड्रा सॉरेसची प्रेग्नेंट होण्याची बातमी समोर आली आहे. सूत्रांच्या सांगण्यानुसार, डिआंड्राच्या प्रेग्नेंसीच्या कारणाने सलमानने 'Bigg Boss' सोडण्याची धमकी दिली आहे.
एका सूत्राने खुलासा केला, 'डिआंड्राच्या प्रेग्नेंसीच्या बातमीने सलमान नाराज झाला आहे. त्याने क्रिएटीव्ही टीमला स्पष्टपणे सांगितले आहे, की स्पर्धक अशाप्रकारचे काम करणार असेल तर तो काम करणार नाही. सलमानने हे पर्वसुध्दा मध्येच सोडून जाणार असल्याची धमकी दिली आहे. 'बिग बॉस' एक फॅमिली शो आहे आणि अशा प्रकरणाने सलमानच्या प्रतिमेवर प्रश्न उपस्थित होत आहे.'
सूत्रांनी सांगितले, की सलमानने डिआंड्राला घराबाहेर काढण्याची मागणी केली आहे. बातमी अशीही आहे, की निर्मात्यांनी सलमानच्या मागणीला स्वीकार करत डिआंड्राला बाहेर करण्याचा निर्णय घेतला आहे.
सांगितले जाते, की गौतमशी वाढलेली जवळिकीनंतर डिआंड्रा प्रेग्नेंट झाली आहे. जर खरेच असे असेल, तर गौतमलासुध्दा याचा परिणाम भोगावा लागणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'बिग बॉस'च्या सेटवर सलमान डिआंड्राची काही छायाचित्रे...