आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'बिग बॉस 7'च्या पहिल्याच भागात सलमानच्या सिनेमाचे प्रमोशन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सलमानच्या ‘मेंटल’ सिनेमाचे नाव बदलून काय ठेवले जाईल अद्याप ठरलेले नाही. मात्र तो याच्या प्रमोशनामध्ये गुंतला आहे. सिनेमाचे पहिले पोस्टर बिग बॉस-7 च्या पहिल्या भागात दाखवले जाईल.

शाहरुख खानने रक्षाबंधनाचे औचित्य साधून आपल्या 'चेन्नई एक्स्प्रेस' सिनेमाच्या दोन तिकीटांवर एक तिकीट मोफत देण्याची घोषणा केली होती. आता सलमान खाननेदेखील 'मेंटल' सिनेमाच्या प्रमोशनसाठी अशीच युक्ती लढवणार आहे. सिनेमाचे पहिले पोस्टर तो 'बिग बॉस'च्या पहिल्या भागात लाँच करणार आहे.

या कार्यक्रमाच्या सूत्रानुसार शोचा पहिला भाग जगभरात तीन कोटी लोक एकत्र पाहतील. ठरल्यानुसार सलमान पहिल्या भागात आपल्या सिनेमाचे पोस्टर दाखवेल. दिगदर्शक सोहेल खानने यासाठी 56 प्रकारचे पोस्टर डिझाइन करून घेतले आहेत. सिनेमात लष्कराचा अधिकारी बनलेल्या सलमानचे पडद्यावर पहिल्यांदाच जय नाव ठेवण्यात आले आहे. अद्याप चित्रपटाचे नाव ठरलेले नाही. मात्र दिग्दर्शक निखिल अडवाणी आणि टिप्सचे डायरेक्टर रमेश तौरानीनंतर आता दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनीदेखील त्याचे रजिस्टर्ड टायटल ‘जय हो’ सोहेलसाठी सोडून दिले आहे.