आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chal Beta Selfie Le Le Re! Salman, Sonam Get Candid On Sets Of Kumkum Bhagya

चल बेटा सेल्फी ले ले रे... 'कुमकुम भाग्य'च्या सेटवर सलमान-सोनमचा दिसला हा खास अंदाज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुपरस्टार सलमान खान आणि फॅशन आयकॉन सोनम कपूर सध्या त्यांच्या आगामी 'प्रेम रतन धन पायो' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. प्रमोशनची एकही संधी ते आपल्या हातून दवडू देत नाहीयेत. अलीकडेच ऑनस्क्रिनची ही फ्रेश जोडी छोट्या पडद्यावरील गाजत असलेल्या 'कुमकुम भाग्य' या मालिकेच्या सेटवर पोहोचली. यावेळी मालिकेतील सर्व कलाकारांनी दोघांसोबत आवर्जुन सेल्फी काढून घेतल्या.
मालिकेतील सध्याच्या ट्रॅकनुसार अभी (शब्बीर अहुवालिया) आणि प्रग्या (श्रुती झा) यांच्यात सुरु असलेल्या भांडणात मध्यस्थी करताना सलमान आणि सोनम मालिकेत दिसणार आहेत. शिवाय आपल्या सिनेमाचे दणक्यात प्रमोशन हे दोघे करतील. एकंदरीतच काय तर, प्रग्या-अभी यांच्यात सुरु असलेल्या भांडणावर सलमान-सोनम कशापद्धतीने तोडगा काढणार हे मालिकेत पाहणे इंट्रेस्टिंग ठरणारेय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'कुमकुम भाग्य'च्या सेटवर क्लिक झालेली ही खास छायाचित्रे...