मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री रेखा रविवारी बिग बॉसच्या मंचावर अवतरल्या होत्या. येथे त्या
आपल्या आगामी सुपरनानी या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने पोहोचल्या होत्या. यावेळी अचंबित करणा-या अनेक गोष्टी उघड झाल्या. एक नजर टाकुया नेमका कोणत्या गोष्टींवरुन यावेळी पडदा उचलला गेला...
1.. रेखा यांच्या सोबत होती सलमानची लग्न करायची इच्छा...
रेखा यांनी यावेळी उघड केले, की जेव्हा मॉर्निंग वॉकसाठी त्या घरुन निघायच्या, तेव्हा सलमान त्यांचा पाठलाग करायचा. त्यावेळी सलमानचे वय केवळ सहा ते आठ वर्षे होते. रेखा यांच्या मते, सलमान त्यांच्या प्रेमात पडला होता. रेखा यांनी पुढे सांगितले, की सलमानने त्याच्या आईवडिलांकडे माझ्यासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
रेखा यांनी हा खुलासा केल्यानंतर सलमान मिश्किलपणे म्हणाला, कदाचित म्हणूनच माझे अद्याप लग्न झालेले नाही. त्याला उत्तर देताना रेखा म्हणाल्या, 'म्हणूनच मी लग्न केले नाही, असेही म्हणता येईल.'
यावेळी सलमानने आपल्या बालपणीचा एक किस्सा शेअर केला. तो म्हणाला, सकाळी साडे पाच वाजता उठून मी रेखा यांना मॉर्निंग वॉक करताना बघायचो. दरम्यान रेखा यांनी योगा शिकणे सुरु केले होते, तेव्हा त्यांना बघायला मी तेथेही पोहोचत होतो.
पुढे वाचा, रेखा यांच्या ओठांवर आले बिग बींचे नाव, पुनीत इस्सरकडे केले दुर्लक्ष...