आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानने कतरिनावर केली खरमरीत टिका, म्हणाला- 'ती माझ्या कामाची नव्हती'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कपिल शर्मा, सोनम कपूर, सलमान खान (इन्सेटमध्ये) कतरीना कैफ
मुंबई: 'प्रेम रतन धन पायो' सिनेमा प्रमोट करण्यासाठी सलमान खान टीव्ही शो 'कॉमेडी नाइट्स विद कपिल'च्या सेटवर पोहोचले. शोमध्ये गप्पा मारत असताना सलमानने एक्स-गर्लफ्रेंड कतरिना कैफविषयी एक खरमरीत टिका केली. एका लोकप्रिय वर्तमानपत्रात छापलेल्या रिपोर्टनुसार, दिवाळी थीमवर आधारित CNWKच्या या एपिसोडमध्ये बॉम्ब-फटाके आणण्यात आले. विशेष म्हणजे, या सर्व फटाक्यांवर कतरिनाचा फोटो लावलेला होता.
सूत्रांच्या सांगण्यानुसार, 'शोमध्ये सलमान मस्तीच्या मूडमध्ये दिसला. परंतु त्याची नजर फटाक्यांवर असलेल्या कतरिनाच्या फोटोंवर पडली, सलमानने कपिलला विचारले हिचे फोटो लावण्याची काय गरज आहे? ही तुझ्या काय कामाची आहे? काही सेकंद थांबून सलमान म्हणाला, ही माझ्यासुध्दा काहीच कामाची नव्हती.'
या कमेंटनंतर दोघे जोरात हसायला लागले. CNWKच्या सेटवर सलमान खान अभिनेत्री सोनम कपूरसोबत सिनेमा प्रमोट करायला पोहोचला होता. हा एपिसोड 8 तारेखेला प्रसारित होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा CNWKच्या सेटवर 'प्रेम रतन धन पायो' प्रमोट करण्यासाठी पोहोचलेल्या सलमान-सोनमचे फोटो...