मुंबई- 'आनंदी' अर्थातच प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येला 15 दिवस उलटले आहेत. तरीही तिच्याशी संबंधित नवनवीन खुलासे होत आहेत. आधी प्रत्युषाचे आई-वडील, फ्रेंड्स आणि राहुल राज सिंहचे माजी वकिल तर आता राहुलची एक्स-गर्लफ्रेंड सलोनी शर्माने खळबळजनक खुलासा केला आहे. सलोनीने पत्रकार परिषद घेऊन स्वत:ची बाजू मांडली. प्रत्युषाला आपण मारहाण केल्याचे सलोनने यावेळी सांगितले. इतकेच नव्हे तर, राहुल व प्रत्युषानेही एकदा आपल्याला बेदम मारहाण केल्याचा गौप्यस्फोटही तिने केला आहे. .
काय म्हणाली सलोनी शर्मा...
सलोनीने सांगितले, 'मी आणि राहुल एकमेकांना मागील पाच वर्षांपासून ओळखतो. आमचे तीन वर्षे अफेअर होते. प्रत्युषाने माझ्या आणि राहुलच्या नात्यात एन्ट्री केली. हे सर्व घडले मे 2015 मध्ये. मला काही फ्रेंड्सने प्रत्युषा आणि राहुलच्या अफेअरविषयी सांगितले. मात्र, राहुल प्रत्युषा त्याची फक्त मैत्रीण असल्याचे सांगत होता.'
कशी झाली सलोनीसोबत भेट...
सलोनीने माध्यमांना सांगितले, की तिची आणि राहुलची भेट 2011मध्ये झाली होती. दोघांनी मिळून एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरु केली होती. सलोनीच्या सांगण्यानुसार, त्यांनी त्यात 30 लाख रुपये लावले होते. सलोनी सांगते, 'कंपनीसाठी आम्ही प्रायव्हेट लोन घेतले होते. मुंबईमध्ये स्वत:चे घर असल्याने मला लोन सहज मिळाले. माझ्या माघारी राहुल प्रत्युषाला भेटायचा. दोघांचे अफेअर सुरु झाले. त्याचदरम्यान कंपनी तोट्यात गेली. जुलै 2011मध्ये मी राहुलला भेटण्यासाठी त्याच्या वीरा देसाई फ्लॅटमध्ये गेले. तिथे मी प्रत्युषा आणि तिच्या आई-वडिलांना पाहिले. यादरम्यान प्रत्युषा मला म्हणाली, की ती आणि राहुल लग्न करणार आहे. म्हणून मला राहुल आणि त्या कंपनीतून निघून जायला हवे. त्याचदिवशी माझे आणि राहुलचे ब्रेकअप झाले.'
पैसे परत मागितले तर घरातून बाहेर हकलले...
सलोनीच्या सांगण्यानुसार, तिने राहुलला पैसे परत मागितल्यानंतर त्याने आणि प्रत्युषाने मला घरातून हकलले. 11 फेब्रुवारी 2016ला मी राहुलकडे माझे पैसे परत मागण्यासाठी गेले होते. यादरम्यान, राहुल आणि प्रत्युषासोबत माझे भांडण झाले. त्याने माझे पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी मला मारहाण केली आणि घरातून बाहेर काढले. त्यामुळे स्वत:चा बचाव करण्यासाठी मीसुध्दा हात उचलला. या प्रकरणाची मी बांगुर नगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. मात्र, नंतर राहुल आणि प्रत्युषाने मला विनंती करून तक्रार मागे घेण्यास सांगितली.
3 वर्षांनंतर राहुल विवाहित असल्याचे माहित झाले...
सलोनीच्या सांगण्यानुसार, तिला राहुलच्या लग्नाविषयी तीन वर्षांनंतर माहित झाले. सलोनी राहुलला 2011पासून ओळखते. विशेष म्हणजे, त्याचवर्षी राहुलने फ्लाइट अटेंडेंट सौगता मुखर्जीसोबत लग्न केले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा राहुल आणि प्रत्युषाचे PHOTOS...