आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'Bigg Boss' स्पर्धक किथची Ex-Wife संयुक्ता, एकेकाळी होती बॉलिवूड अॅक्टेस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संयुक्ता सिंह, 'सलामी' सिनेमात (डावीकडे वरती) आणि लग्नाच्यावेळी किथसोबत (डावीकडे खाली)
मुंबई- माजी मॉडेल आणि व्हिडिओ जॅकी (VJ) किथ सिक्वेअरा 'बिग बॉस 9'मध्ये परत आला आहे. जवळपास दोन आठवड्यांपूर्वी किथच्या भावाचे निधन झाले. याकारणाने त्याला 'बिग बॉस' सोडावे लागले होते. विशेष म्हणजे, किथ घरात नसूनसुध्दा त्याची चर्चा होत राहिली. मागील एका एपिसोडविषयी बोलायचे झाले तर जेव्हा कंवलजीत सिंह किथची गर्लफ्रेंड रोशेल मारिया रावला समजावण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा त्यांनी किथ आणि त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी संयुक्ताला ओळखतो असा उल्लेख केला होता. मात्र रोशेल यामुळे घाबरली नाही, तिने कंवलजीतला सडेतोड उत्तर दिले आणि म्हणाली, याचा तिला जराही फरक पडत नाही.
'बिग बॉस'मध्ये आल्यानंतर किथ बराच लोकप्रिय झाला आहे, परंतु त्याची पूर्वाश्रमीची पत्नी संयुक्ताविषयी क्वचितच लोकांना ठाऊक आहे. या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला संयुक्ताविषयी सांगत आहोत.
बॉलिवूडमध्ये काम करत होती संयुक्ता-
क्वचितच लोकांना माहित आहे, की संयुक्ता सिंह 90च्या दशकात बॉलिवूड सिनेमांत दिसली आहे. तिने 1994मध्ये 'सलामी' सिनेमात अयूब खानसोबत काम केले होते. 'चेहरा क्या देखते हो' गाण्यातसुध्दा संयुक्ता दिसली आहे.
व्हीजे बनण्यापूर्वी किथला डेट करत होती संयुक्ता-
संयुक्ता सिंह किथला डेट करत असताना व्हीजे नव्हती. दोघांनी 2005मध्ये लग्न केले आणि जवळपास 6 वर्षे सोबत राहिले. 2011मध्ये किथने संयुक्तासोबत घटस्फोट घेतला.
अलीकडेच एव्हिक्ट झालेल्या अमन वर्मासोबत संयुक्ताने केले आहे काम-
संयुक्ता सिंह बॉलिवूडसोबतच छोट्या पडद्यावरसुध्दा अक्टिव्ह होती. तिने 'बिग बॉस'च्या घरातून एव्हिक्ट झालेला अभिनेता आणि होस्ट अमन वर्मासोबत काम केले आहे. या मालिकेची मुख्य अभिनेत्री हेलन रिचर्डसन होती. संयुक्ताने यामध्ये एक दत्तक घेतलेली मुली अंतराची भूमिका सकारली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा किथची पूर्वाश्रमीची पत्नी संयुक्ताचे PHOTOS...