आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहाव्या पर्वात सलमानची होती ही आवडती, आता 'Bigg Boss 8' मध्ये करणार 'हल्ला बोल'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो : सना खान)
मुंबईः 'बिग बॉस'च्या सहाव्या पर्वात सलमान खानची आवडती स्पर्धक आणि त्याच्यासोबत 'जय हो' या सिनेमात स्क्रिन शेअर करणारी अभिनेत्री सना खान पुन्हा एकदा बिग बॉसमध्ये परतली आहे. 'बिग बॉस'च्या 'हल्ला बोल' या सीरिजमध्ये तिची एन्ट्री झाली असून पाच चॅलेंजर्सपैकी ती एक आहे. सना खानला बिग बॉसची माजी स्पर्धक म्हणूनच नव्हे तर मॉडेल आणि अभिनेत्रीच्या रुपातही ओळखले जाते.
जाणून घ्या तिच्याविषयीच्या या खास गोष्टी...
मुंबईत झाला जन्म
सना खानचा जन्म 21 ऑगस्ट 1987 रोजी मुंबईत झाला. तिचे कुटुंब मुळचे केरळ येथील कन्नूर येथील आहे. सना खानने मुंबईतून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर तिने शिक्षण सोडून मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण केले.
अॅडल्ट सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री
सना खानने 2005 मध्ये 'ये है हाय सोसायटी ' या लो बजेट अॅडल्ट सिनेमाद्वारे बी टाऊनमध्ये एन्ट्री घेतली. त्यानंतर मार्च 2007 मध्ये एका अण्डरगार्मेन्ट ब्रॅण्डच्या जाहिरातीमधून सनाने टीव्ही क्षेत्रात पदार्पण केले. मात्र सरकारने जाहिरात अश्लिल असल्याचे कारण देत बंद करण्यास सांगितली. याच ब्रॅण्डच्या पुढील जाहिरीमध्येही सनालाच संधी देण्यात आली. बिग बॉस 6 मध्ये होस्ट सलमानची ती आवडती स्पर्धक होती. सलमानबरोबर तीन जाहिरातींमध्ये काम केले. अक्षय कुमार आणि हृतिक रोशनबरोबरही ती जाहिरातींमध्ये झळकलीय. बिग बॉसनंतरच सलमानने जय हो या सिनेमात तिला संधी दिली. सनाने आत्तापर्यंत 5 भाषांमधील 14 सिनेमांमध्ये आणि 50 जाहिरातींमध्ये काम केले आहे.
बॉलिवूडच्या या सिनेमांमध्ये झळकली आहे सना खान
'ये हैं हाई सोसाइटी' (2005), 'बॉम्बे टू गोवा' (2007), 'दन दनादन गोल' (2007),'हल्ला बोल' (2008), 'जय हो' (2014)
बिग बॉसमध्ये तिस-या स्थानावर
सना 2012 मध्ये बिग बॉसच्या सहा पर्वात सहभागी झाली होती. ती शोमध्ये शेवटच्या दिवसापर्यंत टिकून होती. या पर्वाची विजेती उर्वशी ढोलकिया ठरली होती. तर सनाला तिस-या स्थानावर समाधान मानावे लागले होते. याकाळात ती सलमानच्या आवडत्या स्पर्धकांपैकी एक होती.
सना खानचे वादाशी नातेः
  • बिग बॉसमध्ये लेस्बियन किस
सनाने बिग बॉसच्या घरात तिची सह-स्पर्धक असलेल्या आश्का गोराडियाला लेस्बियन किस केले होते. यावरुन बराच वाद निर्माण झाला होता.
  • लग्नाचे सत्य
आपण अद्याप अविवाहित असल्याचे सनाचे म्हणणे आहे. मात्र मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात इस्माइल कादर नावाच्या व्यक्तीसोबत तिचा निकाह झाल्याचे उघड झाले होते. सनाच्या कथित पतीने अभिनेता साहिल खानला मारहाण केली होती. कारण त्याने सना आणि त्याच्या लग्नाचे वृत्त मीडियात उघड केले होते.
  • भावासाठी मुलीचे अपहरण
सना खानवर एका 15 वर्षीय तरुणीचे अपहरण केल्याचा आरोप असून सध्या न्यायालयात हे प्रकरण सुरु आहे. या तरुणीने सनाच्या भावासोबत लग्न करण्यास नकार दिला होता. त्यामुळे तिने तिचे अपहरण घडवून आणले होते.
  • जाहिरातीवरुन वाद
2007 मध्ये एका अण्डरगार्मेन्ट ब्रॅण्डच्या जाहिरातीमधून सनाने टीव्ही क्षेत्रात पदार्पण केले. मात्र सरकारने जाहिरात अश्लिल असल्याचे कारण देत बंद करण्यास सांगितली.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सना खानची निवडक छायाचित्रे...