Home »TV Guide» Sana Saeed And Pearl V Puri In Bigg Boss 11 Contestant

'बिग बॉस 11' मध्ये दिसणार शाहरूखची ऑनस्क्रीन मुलगी, हे असू शकतात इतर कंटेस्टेंट

दिव्य मराठी वेब टीम | Jul 17, 2017, 15:20 PM IST

  • 'कुछ कुछ होता है' चित्रपटात शाहरूख खान आणि सना. आता अशी दिसते सना सईद.
मुंबई - कॉन्ट्रोव्हर्शियल रियालिटी शो बिग बॉसचा 11 वा सिझन लवकरच सुरू होणार आहे. तारीख अद्याप जाहीर झाली नसली तरी कंटेस्टंट्सची चर्चा आणि अंदाज लावण्यास सुरुवात झाली आहे. 10 व्या सिझन प्रमाणेच यावेळीही सेलिब्रिटीज आणि नॉन-सेलिब्रिटीज शोमध्ये सहभागी होतील. एका प्रसिद्ध वेबसाइटनुसार शोसाठी शाहरुखची ऑनस्क्रीन कन्या सना सईद आणि टीव्ही अॅक्टर पर्ल व्ही पुरीलाही अप्रोच करण्यात आले आहे.

कोण आहे सना सईद..
- सना सईद शाहरुख खानच्या सुपरहिट 'कुछ कुछ होता है' चित्रपटात त्याची मुलगी अंजलीच्या भूमिकेने प्रसिद्ध झाली होती.
- 22 सप्टेंबर 1988 मध्ये जन्मलेल्या सनाने चाइल्ड आर्टिस्ट म्हणून 'हर दिल जो प्यार करेगा' आणि 'बादल' अशा चित्रपटांतही काम केले आहे.
- 2014 मध्ये आलेल्या करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द ईअर' द्वारे सनाने अॅक्टींगची सेकंड इनिंग सुरू केली होती. तिने काही टीव्ही शोदेखिल केले. त्यात 'लो हो गई पूजा इस घर की' (2008), 'बाबुल का आंगन छुटे ना' (2008), 'झलक दिखला जा 6' (2013), एमटीव्ही स्प्लिट्सविला सेक्सी सना (2013), नच बलिए 7 (2014) आणि 'फिअर फॅक्टर खतरों के खिलाडी 7' (2016) मध्ये सहभागी झाली आहे.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या कोण कोण बनू शकतात बिग-बॉस 11 चे कंटेस्टंट..

Next Article

Recommended