आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोव्यात झाली टीव्हीच्या \'खुशी\'ची संगीत सेरेमनी, पोहोचले अनेक सेलेब्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेरेमनीदरम्यान फ्रेंड्ससोबत डान्सच्या मूडमध्ये सनाया आणि मोहित - Divya Marathi
सेरेमनीदरम्यान फ्रेंड्ससोबत डान्सच्या मूडमध्ये सनाया आणि मोहित
मुंबई- टीव्हीवर 'खुशी' आणि 'पार्वती' नावाने ओळखल्या जाणा-या सनाया ईराणीचा आज (25 जानेवारी) गोव्यात लग्नसोहळा आहे. रविवारी (24 जानेवारी) रात्री तिची संगीत सेरेमनी प्लेनेट हॉलिवूड या हॉटेलमध्ये झाली. यादरम्यान सनायाने फ्लोरल स्कर्टसोबत पिंक टॉप परिधान केलेले होते. तसेच तिचा भावी पती मोहित सहगल पायजमा कुर्ता आणि ब्राऊन कलरच्या जॅकेटमध्ये दिसला.
पूर्णवेळ 'सुबह होने न दे' गाणे गात राहिले कपल...
संगीत सेरेमनीमध्ये सनाया आणि मोहित पूर्णवेळ 'सुबह होन न दे, रात सोने न दे' गाणे गात राहिले. सेरेमनीमध्ये 'गुलाबो, जुम्मे की रात, गंदी बात, लंडन ठुमकदा आणि अमृतसरी चूडिय'सारख्या बॉलिवूडच्या लोकप्रिय गाण्यांवर सनाया-मोहितसह तेथे उपस्थित पाहूण्यांनी ताल धरला.
अनेक टीव्ही सेलेब्स होते उपस्थित...
संगीत सेरेमनीमध्ये दृष्टी धामी, वरुण सोबती, राकेश वशिष्ठ, किंशुक महाजन आणि अर्जुन बिजलानीसह अनेक टीव्ही सेलेब्स प्रेजेंट होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पहा सेरेमनीचे काही PHOTOS...
सर्व फोटो- अजित रेडेकर