संजय दत्तला पत्नी मान्यताच्या उपचारासाठी पॅरोल मिळाला आहे. तो जेलच्या बाहेर आला आहे आणि आता सध्या त्याच्या घरी राहत आहे. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, मान्यताची शस्त्रक्रिया करण्याची गरज पडू शकते.
तसं संजय आणि सलमान यांचा दोस्ताना सर्वांनाच माहित आहे. दोघंही बॉलिवूडचे प्रसिध्द अभिनेते आहेत आणि दोघंही काही वर्षापासून चांगले मित्रं आहेत. जेव्हा संजयला पोलिस कोठडीची शिक्षा सुनावली होती तेव्हा सलमान उपचारासाठी यू.एस.ए.ला गेला होता. परंतु वापस आल्यानंतर सलमान संजयला भेटायला गेला होता. संजय आणि सलमानने 'साजन' आणि 'चल मेरे भाई' या सिनेमात एकत्रं काम केलं होतं. छोट्या पडद्यावर हे दोघं 'बिग बॉस 5'मध्ये सोबत दिसले होते.
सलमान संजयला नेहमीच मोठ्या भावासारखा मानतं आला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा दोघांची मैत्री...