आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sanskar Dharohar Apno Ki Actor Jay Soni Got Married To Pooja Shah

'ससुराल गेंदा फूल'मधील ईशान ख-या आयुष्यात अडकला लग्नगाठीत, बघा WEDDING ALBUM

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छोट्या पडद्यावरचा प्रसिद्ध अभिनेता जय सोनी 18 फेब्रुवारी रोजी त्याची मैत्रीण पूजा शाहसोबत लग्नगाठीत अडकला. जय आणि पूजा दोघेही गुजराती आहेत. गुजराती पद्धतीने त्यांचा लग्नसोहळा पार पडला. जयची पत्नी पूजा फुटवेअर डिझायनर आहे.
छोट्या पडद्यासोबतच मोठ्या पडद्यावरही जय झळकला आहे. दिल मांगे मोअर आणि मेरा पेहला पेहला प्यार या सिनेमांमध्ये त्याने सहायक अभिनेता म्हणून काम केले होते.
त्यानंतर तो धरती का वीर योद्धा पृथ्वीराज चौहान, बा बहू और बेबी या मालिकांमध्ये झळकला. ससूराल गेंदा फूल आणि संस्कार- धरोहर अपनों की या मालिकांमुळे तो प्रसिद्धीझातोत आला.
लग्नासाठी तो आठ दिवसांच्या सुटीवर असून हनीमूनला गोव्याला जायचे त्याचे प्लानिंग आहे. एप्रिल महिन्यात पुन्हा एकदा पूजासह हनीमूनला जाणार असल्याचे जयने सांगितले.
या लग्नात जयचे छोट्या पडद्यावरील अनेक मित्र सहभागी झाले होते. यामध्ये पूजा कंवल, मुनीषा काठवाणी, सूरज थापर, विशाल सिंह, गौरव बजाज, करण वाही या कलाकारांचा समावेश होते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा जय-पूजाच्या लग्नाची ही खास छायाचित्रे..