(फाइल फोटो- बिग बॉस-4 मध्ये पार पडलेल्या लग्नसमारंभात सारा खान आणि अली मर्चेंट)
2010मध्ये 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोच्या चौथ्या पर्वात अभिनेत्री सारा खानने भरपूर चर्चा एकवटली होती. या शोमध्ये तिने तिचा माजी प्रियकर अली मर्चंटसह चक्क लग्न थाटले होते. शो संपताच त्यांचे लग्नसुद्धा मोडले.
शोमध्ये केवळ प्रसिद्धी एकवटण्यासाठी सारा-अलीच्या लग्नाचा घाट घालण्यात आला होता, असे त्यावेळी म्हटले गेले होते. विशेष म्हणजे या खोट्या लग्नासाठी या दोन्ही स्टार्सना तब्बल 50 लाख रुपये मिळाले होते. मात्र कलर्स वाहिनीच्या एका अधिका-याने सांगितल्याप्रमाणे, शोमध्ये लग्न करण्याचा निर्णय या दोघांचा होता आणि त्यासाठी वाहिनीच्या वतीने त्यांच्यासोबत कोणताही करार करण्यात आला नव्हता.
एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले सारा आणि अली आता एकमेकांची नावेही ऐकणे पसंत करत नाहीत. अलीच्या मते, त्याच्या आयुष्यात सारा आणि वादग्रस्त लग्नाव्यतिरिक्त ब-याच गोष्टी आहेत. त्या वाईट काळातून बाहेर पडलोय, आता त्याविषयी चर्चा करु इच्छित नाही, असे अलीने म्हटले होते. 'सच का सामना' या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झालेल्या अलीने कबूल केले होते, की त्याने हे केवळ पब्लिसिटीसाठी लग्न केले होते. शोमध्ये लग्न करणे ही त्याच्या आयुष्यातील मोठी चुक होती.
या लग्नात अलीचे आईवडील आणि साराचे मामा इरशाद खान सहभागी झाले होते. लग्न मोडल्यावर साराच्या आईने खुलासा केला होता, की या लग्नात अलीच्या आईवडिलांना मौन बाळगण्यास वाहिनीच्या वतीने सांगण्यात आले होते. कारण दोन्ही मुलांचे करिअर पणाला लागले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा रिअॅलिटी शोमध्ये झालेल्या सारा-अलीच्या लग्नाची छायाचित्रे...