आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टिव्ही अॅक्ट्रेसने दाखवली बिकिनी बॉडी, 2 महिन्यांत मोडले होते लग्न, सध्या आहे सिंगल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टीव्ही अॅक्ट्रेस सारा खान सध्या थायलंडच्या पटायामध्ये तिची बहीण आर्या खान (प्रोफेशनल मॉडेल) बरोबर चिल करत आहे. तिने व्हॅकेशनचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यात ती नियॉन ग्रीन बिकिनीमध्ये दिसत आहेत. या फोटोमध्ये ती फारच हॉट आणि सेक्सी दिसत आहे. या फोटोंबरोबर तिने कॅप्शनही दिले आहे..  "Pattaya mornings b like ???????????????? #ssarakhan #pcayruuuuu #vacayyy #work #sisterstrip". काही फोटोमध्ये ती पूलमध्ये एन्जॉय करत आहे, तर काहीमध्ये पूलसाईड दिसत आहे. साराने तिच्या करिअरची सुरुवात 10 वर्षांपूर्वी स्टार प्लसवरील शो 'बिदाई' द्वारे केली होती. त्यात तिने साधनाची भूमिका केली होती. त्याद्वारे ती घराघरांत पोहोचली होती. 
 
'बिग बॉस'मुळे अडकली वादात.. 
2010 मध्ये सारा रियालीटी शो बिग बॉसच्या चौथ्या सिझनमध्ये बॉयफ्रेंड अली मर्चंटबरोबर लग्न केल्याने वादात अडकली होती. पण लवकरच त्यांचे नाते संपुष्टात आले होते. त्यांचा घटस्फोटही चर्चेचा विषय बनला होता. त्यांच्या जवळच्या एका मित्राने खुलासा केला की, त्यांना या लग्नासाठी 50 लाख रुपये मिळाले होते. अलीने सच का सामना या शोमध्ये म्हटले होते की, त्याने हे लग्न फक्त पब्लिसिटीसाठी केले होते. 

पुनरागमन करणार सारा... 
सारा लवकरच स्टार प्लसवरील सिरियल 'जाना न दिल से दूर' द्वारे टीव्हीवर पुनरागमन करत आहे. यात ती शशांक व्यासबरोबर झळकणार आहे. मालिकेत तिचे नाव असेल मलिका. साराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पहिल्या दिवसाचा शूटचा व्हिडीओही शेयर केला आहे. यापूर्वी ती अखेरची ससुराल सिमर का मध्ये झळकली होती. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, साराने पोस्ट केलेले आणि इतर काही  PHOTOS
बातम्या आणखी आहेत...