Home »TV Guide» Sargun Mehta And Ravi Dubey 4th Wedding Anniversary

PIX: इंट्रेस्टिंग आहे 'जमाई राजा'ची लव्ह स्टोरी, या फेमस अॅक्ट्रेससोबत चार वर्षांपूर्वी बांधली लग्नगाठ

दिव्य मराठी वेब टीम | Dec 07, 2017, 16:35 PM IST

'जमाई राजा' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला अभिनेता रवी दुबे आणि सरगुन मेहता आज त्यांच्या लग्नाचा चौथा वाढदिवस वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवसाच्या निमित्ताने रवीने सरगुनसोबतचा एक खास फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन तिच्यासाठी प्रेमळ संदेश लिहिला आहे. रवी म्हणतो. "सरगुन तुम ने मेरी ज़िंदगी में आके सब कुछ बदल दिया ... सिर्फ़ चार सालों में तुमने हर मायने में मुझे रंक से राजा बना दिया ....और कमाल की बात ये है की अभी सिर्फ़ चार साल बीते हैं छियानवे अब भी बाक़ी हैं ...हम दोनों को शादी की चौथी सालगिराह मुबारक हो..."


रिअॅलिटी शोमध्ये केले होते प्रपोज..
- टीव्ही इंडस्ट्रीचे फेमस कपल असलेल्या रवी दुबे आणि सरगुन मेहता यांची लव्ह स्टोरी 'नच बलिए' सिझन पाचची टॉकिंग पॉइंट ठरली होती.
- या सिझनमध्ये रवीने सरगुनला गुडघ्यावर बसून प्रपोज केले होते.
- शोमधून बाहेर पडताच या कपलने 7 डिसेंबर 2013 मध्ये लग्न केले होते.
- दोघांची लव्ह स्टोरी '12/24 करोल बाग' (2009-2010) मध्ये एकत्र काम करताना सुरू झाली होती.
- 2011-12 मध्ये 'फुलवा' मध्ये लीड रोलसाठी सरगुनचे कौतुक झाले होते. तर 'जमाई राजा' आणि 'सास बिना ससुराल' मध्ये रवीच्या कामाचे कौतुक झाले होते.

अॅड फिल्मसाठी रवीला पहिल्यांदा मिळाले होते 20 हजार
- मुळचा यूपीच्या गोरखपुर असलेला रवी टेलीकम्युनिकेशन इंजीनियरिंगच्या शिक्षणासाठी मुंबईमध्ये आले.
- या काळात रवीला मॉडलिंगसाठी ऑफर आल्या.
- 2005 मध्ये रवीला पहिल्या अॅड फिल्मसाठी 20 हजार रुपये मिळाले होते, ज्यामधून त्याने फॅमिलीसाठी गिफ्ट खरेदी केले.
- रवीने 2011 मध्ये 'यू आर माय जान' मधून बॉलिवुडमध्ये डेब्यू केले.

सरगुनला मिळाला बेस्ट अॅक्ट्रेसचा अवॉर्ड
- काही दिवसांपुर्वीच सरगुनला पंजाबी फिल्म 'लव पंजाब' साठी बेस्ट अॅक्ट्रेस कॅटेगरीमध्ये फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला. रवीने सरगुनसोबत त्या अवॉर्ड ट्रॉफीला किस करत फोटो शेयर केला होता.
- सरगुन टीव्ही अॅस्ट्रेससोबतच होस्ट आहे. तिने 'बूगी वूगी किड्स चॅपियनशिप' सारखे शोज होस्ट केले आहेत.
- 2015 मध्ये सरगुनने फिल्म 'अंग्रेज' मध्ये पंजाबी सिनेमामध्ये एंट्री घेतली. हा चित्रपट त्यावर्षातील सेकंड हायएस्ट ग्रॉसिंग चित्रपट ठरला होता.


पुढील स्लाइड्सवर पाहा, रवी आणि सरगुन यांचे वेडिंग PHOTOS...

Next Article

Recommended