आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या TV अभिनेत्याचे पत्नीसोबतचे खासगी क्षण कॅमे-यात झाले कैद, पाहा छायाचित्रे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः टीव्ही अभिनेत्री सरगुन मेहताने 6 सप्टेंबर रोजी वयाची 27 वर्षे पूर्ण केली. यानिमित्ताने सरगुनचा नवरा आणि टीव्ही अभिनेता रवी दुबेने एक पार्टी होस्ट केली होती. या पार्टीत बर्थडे गर्ल सरगुन ब्लॅक कलरच्या ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये दिसली. या आउटफिटमध्ये ती बोल्ड दिसली. पार्टीत रवी आणि सरगुन यांचे अनेक कँडिड मोमेंट्स कॅमे-यात कैद झाले. पार्टीत रवीने आपल्या लाडक्या बायकोला किस करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
पार्टीत रवीने टीव्ही इंडस्ट्रीतील आपल्या अनेक मित्रांना आमंत्रित केले होते. सुमोना, करणवीर बोहरा, त्याची पत्नी टीजे सिद्धू, वाहबिज दोराबजी, कुशाल टंडन, गौतम रोडे, दीपिका सेमसन, आमिर अली, ऋत्विक धंजानी, आशा नेगी, राहुल महाजन, अंकिता भार्गव, कृष्णा अभिषेक, करण ग्रोवर, शशांक व्यास आणि निर्माता रंजन शाहीसह अनेक टीव्ही सेलेब्ससुध्दा या पार्टीत दिसले.
'फुलवा', 'क्या हुआ तेरा वादा', 'बालिका वधू' या मालिकांमध्ये सरगुन महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकली आहे, तर रवी सध्या झी टीव्ही वाहिनीवरील 'जमाई राजा' या मालिकेत मेन लीडमध्ये झळकतोय. 2013 मध्ये रवी आणि सरगुन विवाहबद्ध झाले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, रवी आणि सरगुन यांचे पार्टीदरम्यान क्लिक झालेले खासगी क्षण...