आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ससुराल सिमर का'ने पूर्ण केले 1000 एपिसो़ड्स, पाहा सेलिब्रेशन PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सेलिब्रेशनच्या मूडमध्ये मालिकेतील कलाकार)
मुंबईः कलर्स वाहिनीवर प्रसारित होणा-या 'ससुराल सिमर का' या मालिकेने नुकतेच 1000 भाग पूर्ण केले. यानिमित्ताने मालिकेच्या सेटवर सेलिब्रेशनचे वातावरण होते. कलाकारांनी केक कापून हा आनंद साजरा केला. यानिमित्ताने divyamarathi.comने मालिकेत लीड रोल साकारणा-या अभिनेत्री दीपिका सेमसनसोबत बातचित केली.
दीपिकाने सांगितले, 'आमच्या मालिकेचा बेस्ट ड्रामा सीरीजचा अवॉर्ड मिळाला आहे. या मालिकेच्या क्रिएटिव्ह टीमने मालिकेत अनेक ट्विस्ट आणले आहेत. आम्ही एवढा लांबचा पल्ला गाठला, यावर विश्वास बसत नाहीये. आम्ही प्रामाणिकपणे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला आहे. आत्तापर्यंतचा प्रवास खूप मस्त झाला आहे. आशा आहे, की मालिका आणखी बरेच दिवस प्रेक्षकांचे असेच मनोरंजन करत राहिल.'
दीपकाशिवाय मालिकेत सेकंड लीड साकारणारी अविका गौरसोबतसुद्धा बातचित केली. अविका म्हणाली, '1000 एपिसोड्सचे सेलिब्रेशन करताना खूप आनंद होतोय. मी मालिकेच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा देते आणि आशा करते की मालिका लवकरच 2000 भागांचा टप्पासुद्दा ओलांडेल.'
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सेटवरील सेलिब्रेशनची खास झलक...