आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Satrangi Sasural: Aarushi Vihaan Wedding Special

सतरंगी ससुराल : आरुषी आणि विहानच्या साखरपुड्यात थिरकले दिल्लीकर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('सतरंगी ससुराल'मधील आरुषी उर्फ मुग्धा चाफेकर आणि विहान उर्फ रवीश देसाई)
नवी दिल्लीः झी टीव्हीवर प्रसारित होणा-या 'सतरंगी ससुराल' या मालिकेत अखेर सातही आयांना त्यांचा लाडका मुलगा विहानसाठी आवडीची सून आरुषी मिळाली आहे. त्यामुळे सध्या वत्सल कुटुंबात आनंदाचे वातावरण असून लगीनघाई सुरु झाली आहे. सातही आया विहान आणि आरुषीचे लग्न शाही थाटात करण्याच्या तयारीला लागल्या आहेत.
या लग्नासोबत प्रेक्षकांना जोडण्यासाठी शनिवारी विहान आणि आरुषीचा साखरपुडा आणि संगीताचा कार्यक्रम दिल्लीतील करोलबाग स्थित अजमल खा पार्क येथे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात विहानच्या कुटुंबीयांसोबतच दिल्लीकरांनी ताल धरला होता. आरुषी सातही आयांना पसंत पडली आहे, मात्र दादी माँला अद्याप ती आवडलेली नाही. तर दुसरीकडे सतत भांडणास तयार असलेले आरुषीचे वडील आणि भाऊ लग्नात मोठे कटकारस्थान करण्याच्या तयारीत आहेत. आता 23 ते 28 फेब्रुवारी या काळात रंगणा-या वेडिंग वीक ड्रामामध्ये काय काय होणार हे पाहणे रंजक ठरणार आहे. साखरपुड्याच्या निमित्ताने divyamarathi.comने आरुषी अर्थातच अभिनेत्री मुग्धा चाफेकरसोबत बातचित केली.
>>तू विहानच्या घरी सून म्हणून जाणार आहेस. सात सासू आणि एक आजेसासूसोबत कसे अॅडजस्ट करणार?
- माझ्या सर्व सासूंचे माझ्यावर खूप प्रेम आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत राहण्यास मला त्रास होणार नाही.
>>खासगी आयुष्यात जर सात सासू तुला मिळाल्या तर...?
- खासगी आयुष्यात याविषयी मी विचारही करु शकत नाही. मात्र येथे मी खूप एन्जॉय करतोय.
>>लोक तुला अमृता रावची डुप्लीकेट म्हणतात, याविषयी तुला काय वाटते?
- होय हे खरे आहे. मात्र अमृता मला आवडते, त्यामुळे होत असलेल्या तुलनेविषयी वाईट वाटत नाही.
>> छोट्या पडद्यावर तुझी आणि विवानची जोडी पसंत केली जात आहे. मात्र कॅमे-यामागे तुमची मैत्री कशी आहे?
- आम्ही दोघे शूटिंग सेटवर भरपूर धमाल करतो. आम्ही दोघेही चॉकलेट लव्हर आहोत. वेळ मिळताच आम्ही लपून चॉकलेट खातो.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा आरुषीच्या सासूबाई आणि रवीश देसाईची छायाचित्रे...